
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर:पिंपळगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कुरघोडीच्या राजकारणाने मतदानाच्या पूर्वसंध्येला गंभीर वळण घेतल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात विद्यमान सरपंचासह अनेकजन जखमी झाले आहेत. चौघांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. काल मतदानाच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला
तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असल्या तरी पिंपळगाव येथे दोन्ही गटाने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने अटीतटीची व लक्षवेधी ठरली होती. दोन्ही गटानी आपापल्या विजयाचे दावे करण्याबरोबरच एकदुसऱ्यावर टिकाटिपण्णी व उणेदुणे काढत असल्याने मागच्या आठ ते दहा दिवसापासूनच गावातील तणावपूर्ण वातावरणात तणावपूर्ण झाले होते.या हाणामारीत विद्यमान सरपंच किरण कदम यांच्यासह रावसाहेब मसाजी कदम व आनंदा मसाजी कदम यांना गंभीर दुखापत झाली तर हि परिस्थिती पाहुन रक्तदाब वाढल्याने संजय किशन कदम यांचीही तब्येत बिघडल्यामुळे चौघांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले. झालेल्या हाणामारीत अनेकजण जखमी झाले पण या प्रकरणी कुणीही पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. जखमींना तातडीने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी प्रचंड गर्दी जमली होती. जमलेल्या गर्दीला आवरणात पोलिसांना नाकीनऊ आले.
शनिवारी रात्री घडलेल्या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून रविवारी मतदानाच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी सकाळच्या वेळी काहींनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न चालविला होता परंतु वेळीच पोलिसांनी प्रसाद दिला त्यामुळे वातावरण शांत झाले. मतदानाच्या पूर्वसंध्येला आणि रविवारी सकाळच्या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी सकाळच्या वेळी काहींनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न चालविला होता परंतु वेळीच पोलिसांनी प्रसाद दिला त्यामुळे वातावरण शांत झाले. मतदानाच्या पूर्वसंध्येला आणि रविवारी सकाळच्या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता होती.
हाणामारीच्या घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शनिवारी रात्री उशिरा पिंपळगावला भेट दिली आणि पोलिसांना योग्य त्या सुचना दिल्या. तर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सांगळे हे पिंपळगाव येथेच तळ ठोकून होते. मतदानाच्या दिवशी काहीही गोंधळ होवू नये यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणेसह राज्य राखीव दल, क्यु आर.टी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले.