
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनीधी –
सा.वा दीनदलित कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी काम केल्याबद्दल मला पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे माझ्या या पुढील जीवनात दिन दलितांच्या, कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व गोरगरिबांच्या कल्याणासाठी रस्त्यावर उतरणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी मला पाठबळ द्यावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार प्राप्त आरपीआय जिल्हाध्यक्ष गौतम काळे यांनी केले आहे.
ते मुखेड येथे आरपीआय कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी केले.
गौतम काळे व मानवी हक्क अभियानाचे शंकर पवार यांना दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार देण्यात आला त्यामुळे आरपीआयच्या वतीने या दोघांचा सत्कार सोहळा समारंभ पार पडला या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे राज्य संघटक विजय दादा सोनवणे हे होते तर उद्घाटक म्हणून आमदार डॉक्टर तुषार राठोड यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जि.प सदस्य दशरथराव लोहबंदे, सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर, शिवसेनेचे माजी जिल्हा संघटक शंकर पाटील लुटे, आरपीआय जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर ,शिवाजी भालेराव ,वेंकटराव लोहबंदे, नारायण गायकवाड ,सरपंच बाबुराव कांबळे जुनेकर,के.एच. हासनाळकर,राहुल लोहबंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती यावेळी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त गौतम काळे व शंकर पवार यांचा शाल शिफळ घालून सत्कार करण्यात आला प्रस्ताविक आरपीआय तालुका अध्यक्ष गोवर्धन पवार यांनी केले या सत्काराला उत्तर देताना गौतम काळे म्हणाले की माझ्या कॉलेज जीवनापासून आंबेडकरी चळवळीत व दलित पॅंथर मध्ये काम करून दिन दलितांसाठी लढा दिला दिन दलितांसाठी व शेतकरी कष्टकरी गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी मोर्चे आंदोलने केली त्यामूळे माझ्या कार्याची दखल घेत मला हा पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे माझ्या उर्वरित जीवनात लोकांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत राहनार आहे असे सांगीतले यावेळी दुसरे पुरस्कार प्राप्त शंकर पवार यांनीही आपले यापुढील जीवन दीन दलितातांच्या कामांसाठी सत्कारनी लावनार आहे असे सांगीतले यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड यांचेही भाषण झाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेविका भारतीबाई काळे गोवर्धन पवार संदीप काळे राजू होनवडजकर तेजेरान बनसोडे दिपक काळे मोहन गवळे आदींनी परिश्रम घेतले सुत्रसंचलन गंगाधर सोंडारे यांनी तर आभारप्रदर्शन संदिप काळे यांनी केले.