
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव-देवगाव-हुसेनपुर,बोराळा,हंतोडा,हस्नापुर,हिरापुर,हिंगणी,जवर्डी,सोनगाव,शेलगाव,खिरगव्हाण,मलकापूर बुद्रुक,चिंचोली बुद्रुक,चिंचोली खुर्द या १३
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे.२० डिसेंबरला मतमोजणी होणार असून ३९ मतदान केंद्रावर १२,८१३ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील एकूण १३ ग्रामपंचायतीसाठी १३ सरपंच तर १०३ सदस्यांसाठी १८ डिसेंबर रोजी निवडणुक प्रक्रिया पार पडली आहे.रविवारी (१८ डिसेंबर) रोजी १३ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं असून मंगळवारी (२० डिसेंबर) ला याच १३ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण ८४.८४ टक्के मतदान झालं होतं.राज्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकासआघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार आलं.यानंतर होत असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.