
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
आपल्या विविध मागण्या आणि प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढण्याची मागणी करत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेकडून औरंगाबाद शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. तर प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढले नाही, तर पुढील काळात नाईलाजास्तव परीक्षेवर बहिष्कार, बेमुदत संप यासारखे आंदोलन केले जाईल, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने यावेळी दिला.
यावेळी महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या दीर्घकाळ प्रलंबित असून शिक्षक त्रस्त झाले आहेत. त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत महासंघाने अनेकदा शिक्षण उपसंचालक कार्यालयात पत्र व्यवहार केला आहे. या मागण्यांच्या पूर्ततेबाबत विचारविनिमय करण्यासाठी महासंघाला बैठकीसाठी आमंत्रित करावे अशी विनंतीपत्रे शासनास व शिक्षण मंत्र वारंवार सादर करण्यात आली आहेत.
तर सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी महासंघाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन देखील केले होते. परंतु त्याची दखल शासनाने न घेतल्यामुळे नाईलाजास्तव आज पुन्हा निदर्शने करण्याची वेळ आल्याचं निवेदनात म्हटले आहे.
तर शिक्षकांमधील असंतोष दूर कराल अशी अपेक्षा आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास व महासंघाशी चर्चा करून प्रश्न निकाली न काढल्यास महासंघ या पुढील काळात परीक्षेवरील बहिष्कार, बेमुदत संप यासारखे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.