
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा.आरोग्याला हानिकारक असलेल्या बेचव फंळाचा ग्राहकांवर मोठ्या संख्येत प्रमाणावर भडिमार सुरू आहे. आता तर लिंबु व लिंबुवर्गीय फळे सुध्दा त्यातून सुटलेली नाहीत. सध्या बाजारात पिवळी धमक व आकर्षक दिसणारी फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
फळे पिकण्यापूर्वीच ती
कीटकनाशकाचा उपयोग करून कृत्रिमरित्या पिकवली जात आहेत. कृत्रिमरित्या पिकविलेली फळे अगदी बेचव लागतात तरी ग्राहक त्याला सारखा बळी पडत आहे. यामुळे मानवी आयुक्त धोक्यात आले आहे. ईथॉरॉल नावाचे किटनाशक पाण्यात टाकून त्यात कच्ची फळे बुडविली म्हणजे कच्ची फळे नरम पडतात. आणि ती पक्व झाली म्हणन बाजारात आणली जातात.
दुसराही एक प्रकार काबेटचा आहे. पण त्यासाठी थोडा अवधी द्यावा लागतो. कीटकनाशके किंवा रासायनिक प्रक्रिया करून कच्ची फळे पक्व झाल्याचे दाखवून विक्री करण्याचा धंदा कमालीचा तेजीत आहे. या प्रकियेमधून आलेली फळे लहाण मुलांच्या प्रकृतीवर तात्काळ परिणाम करणारी ठरल्याने वैद्याकिय मंडळी केळी खाण्यास मनाई करू लागली. त्यामुळेच केळींनी आपली किंमत घालवून दिली.
गावठी आंबाझाडे कटाईने कमी झाले तर उरल्यासुरल्या झाडांना फळे लागलीच नाही. कलम केलेल्या आंब्याची आवक बऱ्यापैकी असली तरी ती रासायनिक प्रक्रीयेमधून आलेलीच आहेत. त्यामुळे त्यांना चव नाही. पपई, अननस, सफरचंद, केळी आदी फळे या प्रक्रीयेमधून आलेली असल्याने चव घालवून बसले तर दुसरीकडे प्रकृतीवर विपरित परिणाम होत आहे.