
दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
” गिनिज बुकाने सिराजभाईंच्या १००० गझल लेखनाची नोंद घ्यावी.”
” सिराजभाईंची गझल राष्ट्रीय एकात्मता जोपासणारी”
लेखक–श्रीपाल सबनीस
आंधळी.ता. पलूस. जि सांगली येथील सुप्रसिद्ध साहित्यिक कवी, लेखक, गझलकार सिराज करीम शिकलगार यांच्या ८ गझल संग्रहाचा प्रकाशन समारंभ दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी कराड येथे “यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन (टॉऊन हॉल)” येथे दुपारी १-०० वाजता संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत श्रीपाल सबनीस होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मा.अरुण (अण्णा) लाड चेअरमन, क्रांती सहकारी साखर कारखाना लि; कुंडल यानी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून २२व्या बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध साहित्यिक कवी चंद्रकांत (दादा) वानखेडे, पुणे हे होते.
सदर कार्यक्रमास—
डॉ.अविनाश सांगोलेकर
आद्य मराठी गझल संशोधक व ज्येष्ठ गझलकार पुणे
“सीतायण” कार प्रा. किसनराव कुराडे
अध्यक्ष, शिवराज विद्यासंकुल गडहिंग्लज/ कोल्हापूर
श्री.फ.म.शहाजिंदे
ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक, लातूर
श्री. मसूद पटेल
गझल अभ्यासक व ज्येष्ठ गझलकार, पुणे
ॲड. हाशम पटेल, लातूर
अध्यक्ष, ग्रामीण मुस्लीम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र
श्री.बदीउज्जमा बिराजदार, “सोलापुरी”
ज्येष्ठ गझलकार, सोलापूर
प्राचार्य डॉ.सुरेश कुर्हाडे
ज्येष्ठ साहित्यिक, गडहिंग्लज जि. कोल्हापूर
डॉ. सुनील फडतरे संस्थापक,अध्यक्ष हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराड
श्री.जहिरोद्दीन सय्यद, ज्येष्ठ गझलकार , लातूर
श्री.रविंद्र यशवंतराव, पत्रकार,गझलकार, मुरबाड,
श्री. गुलाबराजा फुलमाळी
संपादक दै. महाराष्ट्र साहित्य दर्पण, पुणे
श्री. दत्तात्रय मानुगडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष
अखिल भारतीय परिवर्तन साहीत्य परिषद
मा. मुजफ्फर सय्यद, रत्नागिरी
कार्याध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य कला मंच
मा.दिनेश माटे, माजी जिल्हाध्यक्ष
संभाजी ब्रिगेड, रत्नागिरी
अनिसा शेख, पुणे, कवयित्री व सचिव, ग्रामीण मुस्लीम मराठी साहित्य संस्था
श्री.किरण शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक, पलूस
श्री.विलास पाटील, कविसरकार, जेष्ठ कवी, इंगळी/कोल्हापूर
हे मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन नेहा मोहोळकर यानी केले.
सिराज शिकलगार यांची आतापर्यंत १८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.ललित, कविता, भजन-भारुड व गझल असा त्यांच्या लेखणीचा प्रवास आहे. त्याना आतापर्यंत विविध साहित्य संस्थांचे २६ पुरस्कार मिळाले आहेत.
आज प्रकाशित झालेल्या ८ गझल संग्रहासह त्यांचे एकूण १३ गझल संग्रह प्रकाशित झाले असून या
प्रकाशित पुस्तकातील गझलांची संख्या १०२७ झालेली आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात एक हजारहून अधिक गझला लिहिण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा त्यांनी पूर्ण केला आहे.
पुस्तक प्रकाशनानंतर दुपारी ३-०० वाजता
श्री. रघुराज मेटकरी, यांचे अध्यक्षतेखाली गझल मुशायरा व कविसंमेलन संपन्न झाले.यात कवि सरकार इ़गळी,बाबा जाधव रूई,प्रतिभा गजरमल सातारा,आनंद गायकवाड पुणे,सीमा मंगरूळ वडूज,व इतर कविनी आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील गझल व काव्य क्षेत्रातील अनेक रसिक बहुसंखेने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन बाजीगर साहित्य सेवा प्रतिष्ठान यांचे वतीने प्रा.डॉ.राजेखान शिकलगार, आंधळी, हाजी आमीन शिकलगार, श्री.हासन शिकलगार, आंधळी, श्री.अशोक पवार, कडेगाव, श्री.सर्जेराव माने, आंधळी, श्री.दस्तगीर शिकलगार, कराड, श्री.शबाना शेख, कराड यानी केले होते.