
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे एक दिवशीय भव्य धरणे आंदोलन करण्यातआले यावेळी आपल्या मागण्यासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र गायकवाड,प्रदेश कार्याध्यक्ष वैजनाथ देशमुख,मराठवाडा अध्यक्ष मिर्झा नवाब बेग ,महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य गौषखा पठाण ,जिल्हाध्यक्ष शेख अजीज, प्रदेश उपाध्यक्ष बालाजी कोकरे, सदस्य विनोद वंजार, संतोष बोराळकर टॅक्सी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम गायकवाड नरसीकर, चंद्रकांत गाजरे, गंगाधर विनकरे, बबलू लाला, दिलीप जमदाडे ,आदी नेते मंडळींनी आपल्या मागण्या जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आल्या आहेत.धरणे आंदोलनात नांदेड जिल्हातील ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.