
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी :अंबुलगा झरी जाणारी बस ही फक्त विद्यार्थ्यांसाठी असून त्यात इतर प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करत असल्याकारणाने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान व वादावाद होत आहे व या बस मध्ये १४० परवासी प्रवास करत आहेत त्यामुळे थांबण्यासाठी सुद्धा जागा नाही त्यामुळे विद्यार्थिनीचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हानी होत आहे तरी आज बस आगार यांना निवेदन देण्यात आले व तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले आठ ते दहा दिवसात जर आमच्या मागणी पूर्ण नाही झाल्या तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष किरण राजकुमार बिरादार यांनी दिले निवेदन दिले या निवेदन उपस्थित पांडुरंग पाटील देगावकर , शेख जाफर , गौस शेख , आशिष फिरंगे प्रीतम रूमले , अक्षय रूमाले संगमेश्वर रुमाले , आधी विद्यार्थिनी उपस्थित होते.