
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा. तालुक्यातील केहाळ वडगाव हानुमान मंदिरात एकादशी निमित्त संत तुकाराम वारकरी सांप्रदायीक भजनीं मंडळ केहाळ वडगाव यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
संत तुकाराम वारकरी सांप्रदायीक भजनी मंडळ अनेक वर्षापासुन गावागावामध्ये प्रत्येक सोमवार, गुरुवार, शनिवार, एकादशीला भजनाचा कार्यक्रम करीतअसून .प्रत्येक एकादशी पंधरा वर्षांपासून गावात पहाटेच जय जय रामकृष्ण हरी भजन करत गावाला प्रदक्षिणा घालतात .द्वाशीला गावातील भक्त मंडळी सकाळी भोजनाची व्यवस्था करतात त्यामुळे गावा-गावात भक्ती मार्गाचे भजनाचे स्वर ऐकायला मिळतात. आधुनिक काळातही त्याच पद्धतीने संत ज्ञानेश्वराचे, संत एकनाथाचे, संत तुकारामांचे, रसाळ व मार्मिक भजन मंडळाकडून गायन केल्या जाते.
कार्यक्रम साजरा होण्याकरिता पखवाज वादक सचिन नाईक, , हार्मोनियमवादक रामप्रसाद सिरसाट , भजनगायक अच्युतरावं दवणे, श्रीकांत महाराज, रावसाहेब दवणे,गजानन नाईक, बाला साहेब नाईक. अविनाश दवणे, सिद्धेश्वर दवणे, पंकज दवणे, प्रशांत दवणे , ओंकार नाईक, वसंतराव नाईक,कैलास महाराज, व्यंकटेश नाईक गजानन दवणे सर्व भाविक भक्त व श्रोते उपस्थित होते.