
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर:- येथील शहीद जवान हणमंत काळे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने व राज्य पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांच्या वतीने प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे,कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,राज्यपुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख जयवंतराव काळे , माजी पं.स.सदस्य व्यंकटराव पाटील घोरबांड, ग्रामसेविका सौ.डि.जी.शिंदे – माने , संभाजी काळम पाटील, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य, नागरिक,रुग्ण उपस्थित होते.
उस्माननगर येथील शहीद जवान प्रतिष्ठानचे आयोजक यांच्या वतीने दि.१९ डिसेंबर रोजी येथील शहीद जवान हणमंत काळे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये बांधकाम , व्यावसायिक कामगार काम करणा-या साठी आरोग्य शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले होते.तसेच गोरगरिब वयोवृद्ध ,दिव्यांग , विधवा ,माता भगिनी तसेच आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.ग्रामपंचायत कार्यलय येथे सकाळ पासून कामगार मजूरांच्या कुटूंबातील सदस्याची मोफत आरोग्य तपासणी H L L टिम व हिंद लॅब नांदेड चे संतोष गायकवाड ( कोऑरडीनेटर ) यांच्या मार्गदर्शनाखाली नविद शेख ,राजू गवलवाड ,आनंद हाटकर ,रितिका चिवळे ,असपाल गायकवाड ,निळकंठ गोरडवार यांनी आरोग्याची तपासणी करून योग्य असे मार्गदर्शन केले.