
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार ग्रामपंचायतीवर चिखलीकरांचे वर्चस्व कंधार तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून सोळा पैकी बारा ग्रामपंचायती वर भाजपाचे वर्चस्व आले तर दोन बिनविरोध व इतर दोन ठिकाणी अपक्षाच्या हाती ग्रामपंचायत गेली आहे कंधार तालुक्यातील १६ ग्रामपंचायत मध्ये निवडणूक झाले त्यापैकी पाताळगंगा व गुलाबवाडी बिनविरोध करण्यात आली तर गांधीनगर ,घुबडवाडी ,लालवाडी जंगमवाडी ,पोखरणी, नवरंगपुरा, सावरगाव, दिग्रस, कोटबाजार, उंमरज,सोमठाणा ,चौकी धर्मापुरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ग्रामपंचायत राखण्यात यश आलं तर इमामवाडी इतर पक्षाच्या ताब्यात गेली आहे.