
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर ..
सरपंच पदासाठी निपाणी सावरगाव ग्रामपंचायतीवर काँग्रेस चे सचिन माधवराव पाटील यांच्या गटाने सात ही उमेदवार बहुमताने निवडून आणले . तर सरपंचपदावर सचिन माधवराव पाटील जाधव यांनी २०६ मते घेऊन भाजपाचे उमेदवार श्री तुकाराम कोकणे यांचा ९६ मतांनी पराभव केला.
निपाणी सावरगाव ग्रामपंचायतचया सरपंचपदासाठी यावेळी मतदान झाले. यात सचिन माधवराव पाटील जाधव यांना २०६ मते तर तुकाराम कोकणे यांना ११० मते मिळाली. रविवार
निपाणी सावरगाव ग्रामपंचायत च्या सात सदस्यांसाठी तीन प्रभागातून निवडून द्यावयाच्या प्रतिनिधीसाठी मतदान घेण्यात आले होते. त्या निवडणुकीची मतमोजणी आज येथील पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या नियंत्रणाखाली घेण्यात आली. यावेळी निपाणी सावरगावच्या प्रभात एक मधून सचिन पाटील गटाचे लक्ष्मीबाई कोंबराजी भिंगे, संजय गोविंदराव कोकणे ,गोदावरी परमेश्वर कोकणे हे विजयी झाले. तर प्रभाग दोन मधून सचिन पाटील गटाचे शंकर दशरथ कोकणे व लक्ष्मीबाई देवराव कोकणे हे उमेदवार निवडून आले. प्रभाग तीन मधून सचिन पाटील गटाचे दत्ता पिराजी वाघमारे व जयश्री मारुती वाघमारे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पं. स. चे विस्तार अधिकारी अशोक झाडे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीण काळेगोरे यांनी काम पाहिले.
विजयी उमेदवाराचे श्रीमती शितलताई अंतापूरकर , जि.प.चे.उपाध्यक्ष रमेशराव देशमुख शिळवणीकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर, , माजी अध्यक्ष एडवोकेट प्रीतम देशमुख हाणेगावकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई देगावकर, माधवराव पाटील सुगावकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आत्माराम पाटील सुगावकर, जि.प.च्या शिक्षण विभागाचे स्वीकत सदस्य बसवराज पाटील वनाळीकर, मोतीराम पाटील ,दत्ता पाटील, श्याम पाटील, अच्युत पाटील खानापूरकर, नरसिंह सूतगिरणीचे संचालक अवधूत भारती सुगावकर यांच्यासह इतरांनी अभिनंदन केले आहे .थेट सरपंचपदावर निवडून आलेले युवा कार्यकर्ते सचिन पाटील हे शिक्षण पदविकाधारक उच्चशिक्षित उमेदवार आहेत. निपाणी सावरगावच्या नागरिकांनी माझे वडील दिवंगत माधवराव पाटील यांच्या पश्चात माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी यापुढे कदापी तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया देऊन सचिन पाटील गटाचे एकहाती वर्चस्वथेट सरपंचपदावर काँग्रेसच्या सचिन पाटलांनी भाजपाच्या उमेदवाराचा केला दणदणीत पराभव
देगलूर तालुक्यातील एकमेव झालेल्या थेट सरपंच पदासाठी निपाणी सावरगाव ग्रामपंचायतीवर काँग्रेसच्या सचिन माधवराव पाटील यांच्या गटाचे सर्वाच्या सर्व सात उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत. तर थेट सरपंचपदावर सचिन माधवराव पाटील जाधव यांनी २०६ मते घेऊन भाजपाचे उमेदवार श्री तुकाराम कोकणे यांचा ९६ मतांनी पराभव केला.
निपाणी सावरगाव ग्रामपंचायतचया सरपंचपदासाठी यावेळी प्रथमच थेट मतदान झाले. यात सचिन माधवराव पाटील जाधव यांना २०६ मते तर तुकाराम कोकणे यांना ११० मते मिळाली तीन मते नोटाला पडली. रविवार ता. १८ रोजी निपाणी सावरगाव ग्रामपंचायत च्या सात सदस्यांसाठी तीन प्रभागातून निवडून द्यावयाच्या प्रतिनिधीसाठी मतदान घेण्यात आले होते. त्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार ता . २० रोजी येथील पंचायत समितीच्या सभागृहात मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या नियंत्रणाखाली घेण्यात आली. यावेळी निपाणी सावरगावच्या प्रभात एक मधून सचिन पाटील गटाचे लक्ष्मीबाई कोंबराजी भिंगे, संजय गोविंदराव कोकणे ,गोदावरी परमेश्वर कोकणे हे विजयी झाले. तर प्रभाग दोन मधून सचिन पाटील गटाचे शंकर दशरथ कोकणे व लक्ष्मीबाई देवराव कोकणे हे उमेदवार निवडून आले. प्रभाग तीन मधून सचिन पाटील गटाचे दत्ता पिराजी वाघमारे व जयश्री मारुती वाघमारे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पं. स. चे विस्तार अधिकारी अशोक झाडे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीण काळेगोरे यांनी काम पाहिले.