
दैनिक चालू वार्ता लोहा प्रतिनिधी-
लोहा तालुक्यातील मौजे रिसनगाव २०२२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १८ डिसेंबर रोजी मतदान झाले व त्यांचा निकाल आज दि. २० डिसेंबर रोजी लोहा तहसिल कार्यालयात मतमोजणी करुन जाहीर करण्यात आला.
काॅग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बाळूमामा ग्रामविकास पॅनलने दणदणीत विजय संपादन करुन सरपंच पदाच्या उमेदवार सौ.सुलोचना प्रकाश पवार यांच्या सहीत ग्राम पंचायत सदस्य पदाचे ८उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.
सरपंच पदाच्या उमेदवार सौ.सुलोचना प्रकाश पवार यांच्या सहीत पुढील ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत बिभीषण दता पवार, यशवंत एकनाथ नाईक,सौ.अंबिका रत्नकांत एकलारे, भीमराव किशनराव नाईक, सौ.मिराबाई शाहूराज शिंदे,बळीराम मुंजाजी पवार, सौ.शितल कैलास खांडेकर, सौ. सुरेखा गजानन जाधव, हे सर्व उमेदवार श्री बाळूमामा ग्रामविकास पॅनलच्या वतीने दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत.
या सर्वांचे पॅनल प्रमुख वसंत संभाजी पवार, मंचक बाबुराव पांढरे, सुभाष पाटील पवार, साहेबराव एकनाथराव नाईक, वैजेनाथ मारोती पवार सर्व मित्रमंडळी गावकरी मंडळी यांनी अभिनंदन केले.