
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरातील बस स्थानकासमोरील सुर्यवंशी मेडीकलचे उद्घाटन लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रात लोहा शहरातील सुर्यवंशी कुंटीबीयाचे मोठे योगदान असुन वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. दिपक सुर्यवंशी हे लोहयानंतर औरंगाबाद येथे सेवा बजावत आहेत तर त्यांचे दुसरे बंधु डॉ. महेश सुर्यवंशी हे लोहा शहरातील सुप्रसिद्ध डायगोनिसट सेंटर चालवून गोरगरिबा रुग्णाची सेवा करीत आहेत तर आता तिसरे बंधु संदिप सुर्यवंशी यांनी लोहा शहरातील बस स्थानकासमोर मेडीकल व्यवसायास प्रारंभ केला असुन त्यांचे उद्घाटन त्यांचेच मोठे बंधू लोहा नगरीचे लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष रामराव सुर्यवंशी, दशरथ सावकार सुर्यवंशी, गंगाधर सावकार सुर्यवंशी माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम,, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक नबीसाब शेख, सरपंच बाबासाहेब बाबर, डॉ. दिनेश मोटे, माजी सैनिक व्यंकट घोडके, यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, व्यापारी आदी मान्यवर उपस्थित होते.