
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा – सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यात 35ग्रामपंचायतपैकी चार ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याअसून 31ग्रामपंचायतीकरीता १८ डिसेंबर रोजी निवडणूक शांततेत पार पडली. या निवडणुकीत सर्व उमेदवारांचे भाग्य इव्हिएम बंद झाले होते. २० डिसेंबर रोजी जी होणाऱ्या मतमोजणीची उत्सुक्ता शिगेला पोहोचली होती. आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीत मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे स्पष्ट झाले. आज झालेल्या मतमोजणीत काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का दिल्याचे दिसून आले. विजयी उमेदवारांनी विजयी मिरवणूक काढून गुलाल उधळून व फटाक्यांची आतिषब- जी करून आनंदोत्सव साजरा केला. मतमोजणीनंतर वर्चस्वासाठी राजकीय पक्षात चढाओढ असल्याचे दिसून येत होते.
मंठा तालुक्यातत ग्रामपंचायत निवडणूक ही गावपुढाऱ्यांना तसेच राजकीय पक्षाच्या अस्तित्वाची लढाई होती. त्यामुळे राजकीय ने त्यांसह गावपुढारी आपल्या पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी व ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करुन प्रचारात रणधुमाळी केली. मतदारांना आकर्षित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने मतदारा- ‘त उत्साह होता. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. बाहेरगावी असलेल्या मतदारांना देखील बोलविण्यात आले. एकंदरीत कुठल्याही प्रकारची कमतरता न ठेवता सर्वच गावपुढाऱ्यांनी ग्रामपंचायतची निवडणूक प्रतिष्ठेची ठरवून लढले. १८ डिसेंबर रोजी 31 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाच्या व सदस्य पदाच्या उमेदवारांचे भाग्य ईव्हिएम बंद झाले होते. त्यांच्या भाग्याचा फैसला २० डिसेंबर रोजी झाला. आज पार पडलेलेल्या मतमोजणीत बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी आपला कौल नवयुवकाकडे काही ठिकाणी न बदलता जैसे थे काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी नाराजीचे चित्र मतमोजणीनंतर दिसून येत होते. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरीता प्रशासनाने प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, नायब तहसीलदार संजय शिंदे,अव्वल कारकून प्रल्हाद दवणे, निवडणूक विभागाचे संदीप उगले, तांत्रिक सहायक बाळासाहेब खारवणे यांनी मतमोजणीचे काम पाहिले. तर पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तहसील कार्यालय व देवी मंदिर परिसर उमेदवार व कर्त्यांनी गर्दीच केली होती. मतमोजणी स्थळी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. तालुक्यात मतमोजणी शांततेत पार पडली. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून फटाके फोडून गावातून विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.(चौकट )🎆वर्चस्वासाठी राजकीय पक्षात चढाओढ***==== ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी पार पडल्यानंतर राजकीय पक्षात वर्चस्वासाठी चढाओढ दिसून येत आहे भाजप पदाधिकान्यांकडून 26 ग्रामपंचायतीवर वर्चस्व असल्याचे सांगितले जात आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 15ते 20आणि बाळासाहेबाची शिवसेना यांनी 5 राष्ट्रवादी काँग्रेस 5, काँग्रेस 10ते 12निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केल्याचे सांगितले जात आहे.. सर्वच राजकीय पक्ष वर्चस्वासाठी आपापली दावे सांगत आहेत.
चौकट *🎆(काही ठिकाणी चूरशीच्या लढती )*
१८ डिसेंबर रोजी पार पडलेली ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची ठरली. मतदारांनी प्रस्थापितांना व पक्षाच्या पॅनलला धक्का देत काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली, नायगाव, तळणी, वाढेगाव -पांढु र्णा, उस्वद, हेलस,पोखरी केंधळे, बरबडा वाघाळा, दहा, हेलसवाडी,ठेंगे वडगाव,तळतोंडी, मुरूमखेडा ग्रामपंचायतीने प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का दिला .
निवडून आलेल्या सरपंचाची यादी
कठाला खु-कानफोडी -नरसिंग रुपसिंग राठोड ,
कर्णावळ – वर्षा कैलास चव्हाण,
जांभ्रूण -तुपा- मीरा विनोद जाधव,
दहा-राठोड अंकुश उधा,
मोहोरा -सुभाष दासू चव्हाण,
एरंडेश्वर -कोकरशा -शेवंताबाई किसन राठोड,
पाकणी -आशा अंकुश चव्हाण ,
पोखरी केंधळे-अनिता मधुकर केंधळे,
टाकलखोपा -बोरुडे प्रभाकर बन्सी,
तळेगाव -दत्ता बळीराम चाटे,
मेसखेडा -प्रकाशराव किसनराव काकडे ,
देवठाणा -मंठा सौ निलावती गणेशराव मोरे,
तळतोंडी -मुरूमखेडा रामेश्वर ज्ञानदेव वरकड,
ठेंगेवडगाव- तुळशीराम देविदास गायकवाड,
उमरखेडा -उर्मिला आनंद जाधव,
नायगाव- -चंद्रकला महादेव सूर्यवंशी,
उस्वद -कमल उद्धव सरोदे ,
गेवराई -जयश्री खरात सतीशराव,
वाढेगाव -पांढुर्णा -छाया परमेश्वर शिंदे ,
तळणी -गौतम सुदाम सदावर्ते,
रामतीर्थ -अर्चना सतीश झोल,
हेलस -गुम्फाबाई विठ्ठलराव बनसोड,
बरबडा -हजारें वैशाली रामेश्वर ,
गुळखंड -कदम कल्याण विठ्ठलराव,
हेलसवाडी -शेख अमीनाबी बुढण ,
काठला बु-.टकले राजुबाई बाबासाहेब,
लावणी -चव्हाण ज्योती दिपक,
वडगाव सरहद्द -डोईफोडे अच्युत उद्धव,
पाडळी दुधा -पुणेकर पंजाबराव फकिराराव ,
अंभोरा शेळके -आघाव अरुणाबाई प्रसाद,
वाघाळा -सुनील उद्धव कांगणे ,
बिनविरोध सरपंच यादी
गुळखंड तांडा -मोसा -आढे विष्णु रामचंद्र,
आंधवाडी -कांबळे नागाबाई हरिभाऊ, कोकरंबा -इक्कर मंदोदरी विठोबा,
राणमळा -कांगणे दत्ताराव कोंडीबा,