
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
परतुर व मंठा-नेर-सेवली तालुक्यात तब्बल 55 ग्रामपंचायती मध्ये कॉग्रेस व महाआघडीच्या सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांना निवडणुन आनत काँग्रेसचा दबदबा कायम राखला असल्याच्या भावना मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी व्यक्त केल्या. आज दिनांक 20 रोजी मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल येताच विजयी उमेदवारांनी परतुर येथील मा.आ.सुरेशकमुार जेथलिया यांच्या संपर्क कार्यालयात गर्दी करत आंनद उत्सव साजरा केला. यावेळी एकुन 84 जागा पैकी 24 ठिकाणी स्पष्ट काँग्रेसची सत्ता आली असून 31 ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेनेसोबत युती करत महाविकासआघाडी ने यश मिळवल्या बददल मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी कार्यकर्त्योनां शुभेच्छा देतांना जेथलिया यांनी म्हटले की, सध्याचा काळ हा अतिशय अति तटीचा असतांना विशेष म्हणजे सत्ताधा-याकंडुन ग्रामपचायती ताब्यात दया आम्ही तुम्हाला करोडो रूपयाचा निधी देउ अशा अनेक थापा देउन ही या सामन्यात कॉगेसच्या पदरी मतदारांनी मोठे यश दिले. मतदारसंघातील महत्वाच्या नेर, तळणी हया मोठया ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता आनुन दिली या बद्दल जेथलिया यांनी मतदारांचे आभार व्यक्त करत कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
दरम्यान परतुर मतदारसंघात ढोकमाळ तांडा, चिंचोंली, चांगतपुरी, बाबुलतारा, दहिफळ भेगांने, खडकी-कंडारी, दैठणा खुर्द, पिंपृळा,कोरेगाव, तळणी, रामतिर्थ, सावरगाव भागडे, खांबेवाडी, मोहाडी, कठाळा खू, पाकणी, ढगी,वाहेगाव यासह अनेक ग्राम पंचायतीत कॉग्रेस महाआघाडी ने सत्ता मिळवली असल्याचे ते म्हणाले, अनेक ठिकाणी अत्यंत कमी मतांनी काँग्रेसच्या सरपंच पदाचे उमेदवार पडले असुन अनेक ग्राम पंचायतीवर सत्ता नसली तरी अनेक कॉग्रेसचे सदस्य निडणुन आनले असुन या माध्यमातुन या मतदारसंघातील विकासाबाबत हे सर्व प्रतिनिधी तळमळीने कामे करत त्या गावांचा रखडलेला विकास मार्गी लावतील असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान यावेळी त्यांच्यासह अनेेक कार्यकर्त्योंची मोठयासंख्येने उपस्तीथी होती.