
दैनिक चालू वार्ता अहमदपूर प्रतिनिधी- विष्णू पोले.
अहमद्पुर: तालुक्यातील ग्रामपंच्यातीचा निकाल लागला अहमद्पुर तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी ने जिंकल्याचा दावा भा.ज.पा.महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गणेश हाके आणी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी दै.चालू वार्ता शी बोलताना केला.
तालुक्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीला आपला बहुमताचा कौल दिला तसेंच महाराष्ट्रातील सतेत असलेल्या शिंदे-फडणविस सरकार वर जनता खुश असल्याचा हा दाखला आहे आणी महाराष्ट्रातील जनतेचा विकास फक्त सध्या महाराष्ट्रात असलेले सरकारच करू शकते आणी त्या निर्धाराने आम्ही काम करतोय.
नवनिर्वाचित सदस्य आणी सरपंच त्यांच्या गावाचा विकास करतील हा विश्वास तथा हमी आम्ही देतो असे म्हणाले.विश्रामगृह अहमद्पुर येथे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके,पाटील विनायकराव पाटील,बाब्रुवान खंदाडे ,अशोक केन्द्रे,डॉ. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी,हणमंत देवकते, श्रीराम मुसळे,विश्वनाथ पोले, आणी इतर सर्व पदाधिकारी उपस्तिथ होते