
दैनिक चालू वार्ता मुखेड ग्रामीण प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड :- मुखेड कंधार विधानसभा मतदार संघाचे *कार्यसम्राट आमदार डॉक्टर तुषार गोविंदरावजी राठोड साहेब* यांचा 23 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने मुखेड शहर भाजप शाखेच्या वतीने नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नेत्र आजाराने त्रस्त असलेल्या गरजू व गरीब रुग्णांना या शिबिराचा लाभ घेण्यासाठी शिबिर स्थळी आणावे.मुखेड कंधार मतदार संघातील इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप करण्यात येणार आहेत. वाढदिवसाच्या दिवशी सर्व शाळेत हे परीक्षा प्याड उपलब्ध असतील.
दुपारी १२:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास हीच निमंत्रण पत्रिका समजुन दिनांक 23 डिसेंबर रोजी
ठीक 12.00 वाजता- कंधार फाटा,मुखेड येथील कार्यक्रम स्थळी आपण उपस्थित राहावे.ही आग्रहाची विनंती.विनीत
आमदार तुषार गोविंदरावजी राठोड साहेब वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा समिती मुखेड कंधार मतदारसंघ.