
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी तालुक्यात १३ ग्रामपंचायती निवडणुकीसाठी नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली.त्याचा निकाल दिनांक २० डिसेंबर रोजी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या टाऊन हॉलमध्ये तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या मार्गदर्शनात, निवडणुक निर्णय अधिकारी सुनील सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी पार पडली असून यामध्ये मलकापूर ग्राम पंचायत वर सुधाकर खारोळे यांच्या काँग्रेस प्रणित पॅनल च्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.ह्या ग्रामपंचायत मध्ये सरपंचासह सात सदस्य विजयी झाले.सरपंच पदासाठी रिना दिनेश काळे ह्या ४२४ मते घेवून विजयी झाल्या असून त्यांनी कृषि उत्पन्न बाजार समिती माजी सभापती यांच्या पत्नी सौ.शोभा अरुण खारोळे यांचा दारुण पराभव केला तर सदस्यांमध्ये अश्विनी अंकित खारोडे,किरण गणेश खारोडे,सौ.मंगला गणेश खारोडे,निर्मला वामन वानखडे,सविता विनोद वानखडे,राजेंद्र साहेबराव काळे,किरण प्रकाश वानखडे हे विजयी झाले.मलकापूर येथे दोन पॅनल मध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली असून सुधाकर खारोळे नेतृत्वाखालील पॅनलने कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अरुण खारोडे यांच्या पॅनलचा धुरळा उडविला.