
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
(मोताळा/प्रतिनिधी):- तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते विजय दिपाजी दोडे यांनी आज आपला तालुका महासचिव या पदाचा राजीनामा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्यामार्फत सुपूर्द केला आहे.
गोरगरिबांच्या समस्या साठी ते नेहमी तत्पर असतात तसेच त्यांचा लोकसंपर्कही दांडगा आहे . परंतु काही दिवसापासून ते वंचित बहुजन आघाडी मध्ये अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला. पुढे गोरगरिबांसाठी आणखी मोठे आंदोलन उभारले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.