
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी–शिवकुमार बिरादार
तालुक्यातील एकमेव सैन्य व पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र असलेले राजे छत्रपती अकॅडमीची यशाची परंपरा कायम राखत २०२२ साली घेण्यात आलेल्या विविध सैन्य दलाच्या भरतीमध्ये अकॅडमीचे 52 विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे प्रतिपादन यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्यात संचालक माजी सैनिक ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांनी केले.
भारतीय सैन्य दलातील विविध पदावर राजे छत्रपती अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल संचालक, राष्ट्रीय संरक्षणरत्न तथा माजी सैनिक ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांच्या वतीने सत्कार सोहळा दि. २२ डिसेंबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.विरुपाक्ष महाराज, उद्घाटक पोलिस निरिक्षक विलास गोबाडे, प्रमुख पाहुणे म्हणून पिएसआय गजानन काळे, पिएसआय गजानन अन्सापुरे, प्रतिष्ठित व्यापारी बंटी कोडगीरे, कैलास मुंडकर, रिपाई जिल्हाध्यक्ष गौतम काळे, शंकरराव पवार, जेष्ठ नेते शंकर पा.लुट्टे, माजी जि.प. सदस्य बालाजी बंडे, शंकर पा.जांभळीकर, प्रा. एम.बी.देशमुख, सरपंच प्र.व्यंकट पा.गवते, माजी सरपंच शिवाजी पाटील जुन्ने, सरपंच प्र.नागनाथ पा.जुन्ने, माजी उपसरपंच सुरेश पा.बेळीकर, उपसरपंच प्र.सिध्दार्थ कांबळे, नारायण पा.जाधव, एम.के.सि.एल.चे सय्यद अखिल, सुनिल पा.आरगीळे, गजानन गेडेवाड आदींची उपस्थिती होती.
यावेळी भारतीय सैन्य दलात, अग्नीवीर भरती, बि.एस.एफ., सीआरपीएफ, आसाम रायफल, सीआय एस एफ, आय टी बि पी, यासारख्या स्टाफ सिलेक्शन भरती मध्ये निवड झालेल्या ५२ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यात ४३ विद्यार्थी व ९ विद्यार्थीनीं आहेत. सैन्य दलातील विविध भरतीमध्ये राजे छत्रपती अकॅडमीच्या १४० विद्यार्थ्यांची शारिरीक परीक्षेत निवड झाली होती. त्यातील काहि विद्यार्थ्यांची उंची, विशेष वैद्यकीय चाचणीत अपात्र ठरल्यामुळे शेवटी ९५ विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिली. त्यातून ५२ विद्यार्थी यशस्वी झाले. यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले की, अकॅडमीचे विद्यार्थ्यांच्या पाठिशी असणारी अहोरात्र महेनत, योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची जिद्द व महेनतीच्या बळावर यश संपादन केल्याचे म्हटले. यावेळी पोलिस निरिक्षक विलास गोबाडे म्हणाले की, २० वर्ष देशाची सेवा करुन सेवानिवृत्त होऊन मुखेड सारख्या डोंगराळ भागात सैन्य भरती पुर्व प्रशिक्षण देणारी अकॅडमीची उभारणी माजी सैनिक ज्ञानेश्वर पा.डुमणे यांनी केली. त्यांच्या अथक परिश्रमामुळे दरवर्षी ३०० ते ३५० विद्यार्थी भरतीपुर्व प्रशिक्षण घेत आहेत. त्यातील शेकडो विद्यार्थी देशाच्या विविध भागात सेवा बजावत आहेत. यशस्वी निकालामुळे राज्यभरात अकॅडमीचे नाव पोहचत आहे. अकॅडमीत मुला-मुलींसाठी उत्तम अशी स्वतंत्र व्यवस्था असल्याने महाराष्ट्रासह परराज्यातील विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. अकॅडमीच्या सुरूवातीपासूनच डुमणे पाटिल हे गरिब, अनाथ व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना मोफत प्रशिक्षण देत आहेत. संचालक ज्ञानेश्वर पा.डुमणे यांनी देशसेवेनंतर सामाजिक बांधिलकीतुन करत असलेल्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अकॅडमीला भेट देवून त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. यासत्कार सोहळ्यासाठी माजी सैनिक इसाक पठाण, माजी सैनिक गोविंद कवटीकवार, सैनिक बालाजी हुलगंडे, सैनिक चंद्रकांत डुमणे सह प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेताब शेख तर आभार सहशिक्षिका अश्विनी मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक शंकर पा. हिवराळे, बालाजी पा.हिवराळे, प्रदिप चव्हाण, गंगाधर कैलासे, नवनाथ पा.लुट्टे आदींनी परिश्रम घेतले.