
दैनिक चालू वार्ता नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- सौरभ सुतार,
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाने सहकार महर्षी साखर कारखाना परिसरात ड्रोन ॲग्रीकल्चर मार्फत ऊस पिकासाठी उपयुक्त टॉनिक फवारणीचे प्रात्यक्षिक कारखाना परीसरात दाखवण्यात आले.
बावडा तालुका इंदापूर येथे,,बावडा गट विभागीय कार्यालयाच्या परिसरामध्ये व साखर कारखान्याचे संचालक महादेवराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली व ॲग्री ओरशील धनाजी भोसले सहित सर्व फिल्डवरील अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने. बावडा येथील ऊस उत्पादक सभासद दत्तू राघू कोरडे यांच्या ऊस शेती प्लॉटमध्ये ड्रोन द्वारे उसावर टॉनिक फवारण्याचे प्रत्यक्षीक दाखवण्यात आले.
संचालक महादेव घाडगे याप्रसंगी बोलत आसताना म्हणाले की
सभासदांना उसावरील टॉनिकचे औषध कारखान्या मार्फत कमी शुल्क आकरून देणार आहे याचा सर्व सभासदांनी लाभ घेऊन ऊस उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आसल्याचे संचालक महादेव घाडगे बोलत होते,
कमी वेळेत सर्व ऊस पिकावर ड्रोन ॲग्रीकल्चर मार्फत एकाच ठिकाणा वरून औषध व टॉनिक फवारण्यासाठी अधिकृत माहिती शेतकऱ्यांना यावेळी कारखान्या मार्फत सांगण्यात आली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ड्रोन द्वारे फवारणीच्या माहिती साठी राज्यात प्रथमच अकलूज साखर कारखान्याने हा प्रयोग यशस्वीरित्या सक्षम करून दाखवीला. या ड्रोन द्वारे अनेक प्रकारचे कीटकनाशक, बुरशीनाशक, सूक्ष्मअन्नद्रव्ये, लोकरी मावा, यासारखे सर्वच औषध फवारणी करण्यासाठी सभासदांना याबद्दल माहिती देण्यात आली.
वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्यातर्फे मल्टी मेक्रोन्यूटिंन्ट,मल्टी मल्टीमेट्रोनॉटिंट, व वसंत ऊर्जा
हे तीन औषध एकत्र करून उसासाठी टॉनिक म्हणून पोषक असे वरदान औषध ठरलेले आहे.
टॉनिक अथवा औषध फवारणीसाठी
साखर कारखान्या मार्फत कमी शुल्क अकरून सभासदांना ड्रोन द्वारे फवारणी करण्यासाठी कमी शुल्क मिळवून देण्यास साखर कारखान्याने पुढाकार घेतलेला आहे.10 लिटर पाण्यासहित तीन औषध एकत्र करून फवारणी करण्यात येते.व ही तिन औषध कारखान्या मार्फत कमिशुल्क ना नफा ना तोटा या तत्त्वावर साखर कारखाना सभासदांना विभागीय कार्यालयामध्ये उपलब्ध करून मागणी संदर्भात देण्याची व्यवस्था करणार आसल्याचे संचालक महादेवराव घाडगे बोलत होते.टॉनिकही फवारणीचे औषध विभागीय कार्यालयामध्ये सभासदांना मिळवून देण्यात येतील.
साखर कारखान्या मार्फत ड्रोन फवारणीच्या प्रात्यक्षिक साठी उपस्थित कारखान्याचे संचालक महादेवराव घाडगे, ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव सावंत , दीपकराव कोकाटे, ज्ञानदेव घोगरे, धनाजी कोकाटे, मोहन शेटे, शिवाजी घोगरे, सहित बावडा गट सेंटर विभागीय कार्यालयातील ॲग्रीवर्षील धनाजी भोसले सहित सर्व फिल्ड स्टॉप तसेच बावडा परिसरातील सर्वच कारखान्याचे सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————-