
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
अभिनव ज्ञान मंदिर उसर खर्द ही तळा तालुक्यातील शाळा नेहमीच प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असनारी शाळेची शिस्त, विविध उपक्रम गुणवत्ता माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा सलग ११ वेळ १००% निकाल, देऊन गुणवत्ता कशी टिकवायची, यांचे एक उत्कृष्ट उदाहरण होय. सामाजिक बांधिलकी जपणारी व पंचक्रोशीतील सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी झटणारी शाळा म्हणून बहूदा याच गुणांना हेरुन स्वदेश फाउंडेशन आणि येथील सतत कार्यरत असणारे बाळासाहेब गणपती दुधाळ माजी मुख्याध्यापक, यांच्या पासून सुरु झालेली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा मुहर्तमेढ रोवली गेली ते आजी मुख्याधिपिका श्रीमती अंजली विजय धारसे मॅडम व शिक्षक वर्ग श्री मनोज भाऊ सुतार, श्री विनोद गंगाराम लाड, श्री दिपक पांडुरंग गुज्जर श्री अर्जुन दादासाहेब पाटील, श्री अरविंद वेलजी गावित, श्री राजेंद्र चंद्रकांत भगत अश्या तज्ञ् शिक्षक वर्गांचे उत्तम मार्गदर्शन त्यांना तेवढीच मौलाची साथ देणारे लेखनिक राकेश रामदास जाधव व आणि काकण भर जास्तच श्रम करून शाळेची स्वच्छता व टापटीप पणा राखणारे श्री पवन कानू महाडीक (शिपाई काका ) त्यांच्याच बरोबरीने सहकार्य करणारे श्री संतोष बळीराम घाग ( शिपाई ) कर्मचारी वर्गाना बहूदा याच गुणांने हेरले.
स्वदेश फाउंडेशन मार्फत सर्वोत्कृष्ट शाळा निवडण्यासाठी २०१९ मध्ये सुरुवात झाली आणि सर्वेक्षण सुरू झाले विद्यार्थ्यांची गुणवत्ता शाळेची इमारत, स्वच्छता, शिस्त आणि येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत देवो भव वृत्तीने करणे सर्व निकषस प्राप्त झाल्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्काराची मानकरी ठरली ही अभिनव ज्ञान मंदिर उसर खर्द शाळा आज रायगड जिल्हा परिषदेमध्ये स्वदेश फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या समारंभात अभिनव ज्ञान मंदिर उसर खर्द शाळेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार, ५ लाख रुपये, व प्रमाणपत्र, ट्रॉफी देवून डॉ किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी रा.जि.प व झरीना स्कूवाल संस्थापक स्वदेश फाउंडेशन,व मंगेश वांजे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वदेश फाउंडेशन यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.
आज सर्व सुख सोईने नटलेली शाळा, शाळेची भव्य इमारत स्वच्छसुंदर भव्य पटांगण स्वच्छ , स्वच्छतागृह, सदादीत शाळेची बाग संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, शिक्षक कक्ष, प्रार्थना हॉल आणि ज्ञान रचना वाद अध्यापन वर्ग प्रत्येक वर्ग डिजिटल, प्रशिक्षित अनुभवी मेहनती शिक्षक वर्ग कष्टाळू शिपाई लेखनिक व उत्कूष्ट मार्गदर्शक मुख्याध्यापिका असा एका हेतूने भरलेल्या कर्मचारी वर्गाचे संपूर्ण रायगड जिल्ह्यांतून तळा तालुक्यातून तसेच उसर पंचक्रोशीतील स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, संस्था पदाधिकारी,शासकिय अधिकारी, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी, यांच्या कडून विद्यालयाचे कौतुक होत आहे याच गोष्टीचा विचार व आदर्श वा बोध घेऊन इतर शाळेनेही प्रयत्न नक्कीच करावा जेणे करून शाळा, शाळा मध्ये स्पर्धा होऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल आणि ती टिकली ही जाईल.