
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- वरुड शहरातील केदार चौक महात्मा गांधी पुतळा परिसरातील नगरपरिषद तसेच पोलीस प्रशासना द्वारे शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले आणि शासकीय जागेत कोणीही अतिक्रमण करू नये असे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी म्हटले.नागरिकांनी भाजी फळ खरेदी नगरपरिषद मार्फत नव्याने लिलाव करण्यात आलेल्या बाजारपेठेत निर्माण करण्यात आलेल्या बाजार मोठे परिसरातूनच खरेदी करावी असे आवाहन सुद्धा प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी केले.
वरुड नगरपालिकेच्या वतीने २२ डिसेंबर रोजी अतिक्रमण मोहीम छेडण्यात आली.दरम्यान धनगवडी बाबा मंदिराजवळ चे अतिक्रमण हटवून हा संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला.कारण येथील भाजी असणाऱ्या दुकानांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.अतिक्रमणापूर्वी सर्वांना तशा प्रकारच्या नगरपालिकेच्या वतीने सूचना देण्यात आल्या होत्या.प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रवीण मानकर आणि ठाणेदार चोगावकर यांच्या पोलीस बंदोबस्तासह यांच्या मार्गदर्शनात गाडगे,आमले,फुसे व नगरपरिषदेची कर्मचारी यांचा अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभाग होता.तसेच मुख्याधिकारी यांनी अपेक्षा व्यक्त केली की जनतेने आता नव्या जागेवरून भाजीपाला,फळ नवीन बाजारपेठेतून खरेदी करावी.एकंदरीत नव्या जागेमुळे भाजीपाला विक्रेते,फळ विक्रेत्यांमध्ये उत्साह निर्माण दिसला.