
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- आपला भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षा सारखा प्रदिर्घ कालावधी लोटला गेला आहे.दरम्यानच्या काळा मधे आपल्या महाराष्ट्र राज्या मधे प्रत्येत जाती धर्मातील गरीब कुटूंबातील कुटूंबियांचा आर्थिक स्तर उंचाऊन त्यांना पण प्रगती पथावर आणन्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात.परंतु आपल्या देशातील अठरा पगड जाती मधून निर्माण झालेली एक जात आहे व ती मणजे ड्रायव्हर जात होय.
परंतु आपल्या भारत देशा मधे मागील 75 वर्षा पासून अनेक सरकारे आली व गेली परंतु आज पर्यंतच्या एका हि राज्य वा केंद्र सरकारने ड्रायव्हरच्या प्रगती बाबत त्यांच्या परिवाराच्या बाबत त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी प्रयत्न केलेले नाहित.त्याच अनुषंगाने दि.20 डिसेंबर 2022 रोजी औरंगाबाद येथील जय संघर्ष वाहन चालक सामाजीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय माणिकराव हाळनोर यांच्या नेतृत्वात नागपुर येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता.सदरच्या मोर्चा मधे महाराष्ट्रातील वाहन चालक बांधवांसह शेजारील छत्तीसगढं,तेलंगणा व मध्य प्रदेशातील वाहन चालक मीळून जवळ पास पंधरा हजार वाहन चालक मोर्चा मधे सहभागी झाले होते.
वाहन चालकांचे प्रलंबीत आर्थिक महामंडळ, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते आपघात योजना,दलित व आदिवासी समाजा प्रमाणेच वाहन चालकावर होणार्या अन्यायाला आळा बसावा मणुन कठोर कायद्याची तरतूद करण्यात यावी तसेच वाहन चालकांच्या पण सन्मानासाठी 17 सप्टेंबर हा ड्रायव्हर डे घोषीत करण्यात यावा या व इतर अन्य मागण्यांचे निवेदन राज्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी स्वीकारले.
आमच्या वरील मागण्यांचा सरकारच्या वतीने त्वरीत निपटारा करावा अन्यथा जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात तिव्र आंदोलन करण्यात येतील आसा इशारा नागपुर येथील चालू आसलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान पत्रकरा़ंशी बोलतांना श्री संजय हाळनोर यांनी दिला.
निवेदन देते वेळेस संस्थेचे उपाध्यक्ष श्री संतोष काळवणे औरंगाबाद, संस्थेच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा श्रीमती वंदनाताई मोरे रायगड,संस्थेचे प्रदेश अध्यक्ष विनोद चांदेकर,नागपुर अध्यक्ष अमोल खारेकरसह प्रवीण वाघ गोंदेगाव पाचोरा इ.शिष्ट मंडळा मधे सहभागी झालेले होते.