दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-झारखंड राज्यातील जैन समाजाचे पवित्र स्थळ सम्मेद शिखर हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर झारखंड सरकारच्या या निर्णयाला समस्त जैन समाजाकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे.संपूर्ण जैन समाजाच्या वतीने निषेध मुक मोर्चा काढून,प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.
झारखंड सरकारने सम्मेद शिखर हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयामुळे जैन समाजाच्या या पवित्र स्थळाचे पावित्र्य नष्ट होऊ शकते,असे वक्तव्य समस्त जैन समाजात सुरू आहे.नांदगाव खंडेश्वर येथील संपूर्ण जैन समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.बुधवारी नांदगाव खंडेश्वर गावातील चौकातून तहसील कार्यालयापर्यंत जैन बांधवांनी आपला मोर्चा काढला होता.या मोर्चाला जैन मंदिरापासून सुरुवात करण्यात आली.मोर्चादरम्यान झारखंड सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि सरकारच्या या निर्णयाला दुजोरा देण्यात आला.सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली.तहसीलदार द्वारा केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांना हे निवेदन देण्यात आले आहे