दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनीधी-नवनाथ डिगोळे
तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीचा निकाल मंगळवारी घोषित करण्यात आला.यामध्ये बोथी येथील नव तरुण नेतृत्व बालाजी आवाळे यांना बोथीकरांनी निवडून दिले आहे.मतदारांनी तरुण नेतृत्वा ला यावेळी संधी दिली आहे.जनसेवा परिवर्तन ग्रामविकास पॅनल चे अधिकाधिक उमेदवार निवडून आले आहेत.यामध्ये शशिकांत नानासाहेब भोसले,छाया नरसिंग शेवाळे,गुराबाई हणमंत कांबळे,रेखा अंगद हाक्के, धर्मपाल पंढरी पवार,निर्मला बालाजी पूर्णे,सुदर्शन ज्ञानोबा गायकवाड,हे सदस्य निवडूण आले आहेत.गावातील अनेक गरजू सोयी सुविधा,नाली- रस्ते अश्या बहुतांश सोयी सुविधा अमलात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच बालाजी आवाळे यांनी बोलताना सांगीतले . बोथीकरांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला निवडून दिले आहे. या संधीचे सोन केल्याशिवाय रहानार नाही . गावामध्ये अधिकाधिक विकासकामे कसे आणता येईल या कडे सर्वाधिक माझे लक्ष असणार आहे.२० वर्षात ज्यांना जमलं नाही ते फक्त ५ वर्षात करून दाखवणार असल्याचे ते त्यांनी सांगितले व हा विजय माझा नसुन तमाम बोथी व बोथी तांड्यातील जनतेचा आहे
बोथी व बोथी तांड्यात बालाजी विश्वनाथआप्पा आवाळे निवडून आल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे.
