
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा प्रतिनिधी -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेला विजय हा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी तालुक्यात केलेल्या विकास कामांचा विजय असून सर्वसामान्य जनतेने विकास कामाची दिलेली पावती आहे.त्या मुळे तालुक्यातील जनता भारतीय जनता पार्टी सोबत असल्याचे तालुकाध्यक्ष सतिशराव निर्वळ यांनी सागितले
पुढे बोलताना सतीशराव निर्वळ म्हणाले की माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या माध्यमातून मंठा तालुक्यातील गावागावातील भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक बांधणी आणि विकास कामे यामुळेच सर्वसामान्य जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले
मंठा तालुक्यातील 35 ग्रामपंचायत निवडणुकीत 26 गावातील ग्रामपंचायत वर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले असून यावेळी उपस्थित सरपंच व सदस्यांचा सत्कार सतीशराव निर्वळ यांच्या हस्ते करण्यात आला
या वेळी तालुक्यातील कोकरंबा,जांभरुण,तुपा, वडगाव सरहद,अंभोरा शेळके,वाडेगाव पांढुर्णा, तळेगाव,दहा,पोखरी केंदळे,माहोरा,उमरखेड, पाडळी दुधा,कर्नावल,गेवराई,देवठाणा मंठा, रानमळा,हेलसवाडी,कटाळा खुर्द,कानफोडी, कटाळा बुद्रुक,गुळखंड,गुळखंड तांडा,मोसा, बरबडा,लावणी,या गावातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप गोरे,गणेशराव खवणे,राजेश मोरे,प्रसादराव बोराडे,सुभाषराव राठोड,विठ्ठलराव काळे,गजानन देशमुख, मुस्तफा पठाण,दारासिंग चव्हाण, जिल्हा परिषद हनवते प्रल्हादरावजी बोराडे,लक्ष्मण बोराडे,नितीन सरकटे,दिपकअप्पा दवणे,भगवानराव सरकटे,..-