
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथील देशी दारू परवानाधारकाकडुन शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून देशी दारूची जादा दराने विक्री करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे,चिल्लर विक्रीची परवानगी असताना देशी दारूची ठोक विक्री करण्यात येत आहे,देशी दारूच्या पेटी मागे उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना ही आपला वाटा मिळत असल्याने त्यांनी सुद्धा या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र सावळी सदोबा परिसरामध्ये पाहायला मिळत आहे,त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध गुन्हे नोंदविले जाणार की नाही असा सवाल केला जात आहे,शासनाच्या नियमानुसार दारूच्या बाटलीची कींमत ७० रूपये असतांना ८० रुपये किमतीने विक्री होत आहे,किंमतीपेक्षा अधिक दर घेणे बंधनकारक असताना सुद्धा परवानाधारक कुणालाही न जुमता आपली मनमानी करीत आहे,देशी दारू दुकानदाराच्या पेट्या मोठ्या प्रमाणात विक्री व्हाव्या यासाठी उत्पादन शुल्क विभाग कारवाई करीत नसल्याची माहिती आहे,महिन्याकाठी मोठी रक्कम मिळावी याकडे आर्थिकलक्ष केंद्रित केले जात असल्याचे बोलले जात आहे,या मिलीभगत कारभारामुळे परवानाधारकांची मनमानी वाढलली असल्याने,ग्राहकांची मोठी लूट सुरू आहे,चिल्लर दराप्रमाणे दारूची विक्री परवानगी असताना, परवानाधारकांकडून नियमाबायरित्या होलसेल विक्रीचा सपाटा लावण्यात आला आहे,त्यामुळे सावळी सदोबा परिसरात अवैध दारू विक्रीने कळस गाठला आहे,सावळी सदोबा परिसरातील ईचोरा,माळेगांव,दातोडी,दहेली,आयता ,बेलोरा,सह बहुतांश गावात पेट्यांची खेप पोचविली जात आहे,या संपूर्ण प्रकाराची माहिती पारवा पोलीस स्टेशन तथा उत्पादन शुल्क विभाग यांना असताना सुद्धा हेतू पुरस्कर दुर्लक्ष केले जात आहे.