
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा÷ पूर्णा तालुक्यातील मौजे माकणी येथील रहिवासी सौ सुनीता तुकाराम कुरे वय वर्ष 40 असून या महिलेला दोन आपत्ये होती. वय वर्ष 14 व वय वर्षे 03 असे दोन्ही मुले होती.परंतु 14 वर्षाचा मोठा मुलगा सर्पदंश होऊन मृत्यू पावला. नंतर काही दिवसांनी अचानक छोटा मुलगा 03 वर्षाचा डेंगू तापीने तोही मरण पावला.
कुरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांच्या वंशाला कोणीही आधार उरला नाही. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही कुरे कुटुंबीयांनी केलेली होती. कुरे कुटुंबीयांच्या नातलगाने लोहा येथील डॉ. गणेश चव्हाण यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. आणि डॉ. गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार करून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पुनश्च खुली (ओपन) करण्यात आली. अवघ्या एका वर्षात या महिलेला गर्भधारणा राहून दि.15 डिसेंबर 2022 या रोजी कुरे कुटुंबीयांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे .डॉ. गणेश चव्हाण यांनी अंधारात बुडालेल्या कुरे कुटुंबीयांना एक आशेचा किरण दाखवत आधार दिला आहे .त्यामुळे डॉ. गणेश चव्हाण यांच्यावर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.