
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
आझाद ग्रूपच्या वतीने रिसनगाव येथे श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडेरायाच्या यात्रेतील पालखीचे मानकरी असणारे वीर नागोजी नाईक यांचे तेरावे वंशज श्री गणपतराव नाईक यांचे व तसेच नुकत्याच झालेल्या रिसनगाव ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत नव्याने निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच सौ. सुलोचना प्रकाश पवार व सर्व नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी आझाद ग्रुपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिपक रायफळे, लोहा तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोसकर ,सतीश पाटील बाबर , यांच्या सहित मोठ्या गावकरी मंडळी, भाविक भक्त उपस्थित होते.