
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी- कवि सरकार इंगळी.
कवि सरकार स्वाभिमानी वाचनालयाची इंगळी आयोजित १२वे मराठी ग्रामीण साहित्यकारों संमेलन मोठ्या उत्साहवात श्री विठ्ठल बिरदेव मंदीर येथील भंडारखाना सभागृहात फार पडले.
सकाळी संमेलन अध्यक्ष प्रसिद्द लेखक डाॅ. मा.ग.गुरव यांचे उपस्थीत गझलकार सिराज शिकलगार आंदळी यांचे हस्ते संमेलनाचे उद्घाटन करणेत आले.तर प्रतिमा पुजन माजी डी.या.एस.पी.नारायन खानू मोठे देसाई यांचे हस्ते झाले.
प्रास्ताविक कवि सरकार इंगळी यांनी केले. तर स्वागत प्रा्.डाॅ.सुरेश कुराडे सर यांनी करून साहित्य विषयी आपले विचार मांडले.व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मानपत्रे व गौरवचिन्ह देऊन सन्मानीत करणेत आले.उद्घाटन सत्रात गझलकार सिराज शिकलगार, नारायन खानू मोठे देसाई,यांनी आपले विचार मांडले.संमेलन अध्यक्ष लेखक मा्ग. गुरल यांनी नवोदीत साहित्यांत समाजात घडणाऱ्या घडामोडीचा विचार करून सध्या घडत असलेल्या घटकावर लिहले पाहिजे असे सांगितलें यावेळीं कवि सरकार संपादीत संमेलन विशेषांकाचे आणि दानवाडचे बालकवी जाधव हांच्या पुस्तकांचे मान्यालरांचे हस्ते प्रकाशन करणेत आले. . दुसऱ्या सत्रात ,माहिती व तंत्रज्ञानाच्या जमान्यात हरवत चाललेलं साहित्य या विषयावर परिसंवाद घेणेत आला सौ,नसिम जमादार या परिसंवादाच्या अस्यक्षा होत्या. बाबासो कांबळे,सौ.प्रा.डाॅ.सविता व्हटकर यां सहभाग घेतला होता.त्यांनी आपले विचार मांडले.तिसऱ्या सत्रात लेखक ,कथाकथनकार परशराम आंबील,तानाजी आसबे,एम. डी. रावण यांशी आपले मनोगत व्यक्त केले.त्याचप्रमाणे साहित्य,शैक्षणिक,सामाजिक,कला क्षेत्रात
योगदान असणारे नामवंताना प्रा.सितायणकार लेखक किशनराव कुऱ्हाडे यांचे हस्ते पुरस्कारानं सन्मानचिन्ह व गौरव पत्र देऊन गौरवण्यात आले.
चौथ्या सत्रात प्रसिद्द कवि मन्सूर जमादार कडेगाव यांचे अध्यक्षतेखाली बहारदार कवि संमेलन फार पडले.त्यात प्रतिभा गजरमल सातारा,मधूकर हुजरे उस्मानाबाद,भाऊसो कांबळे ऐनवली खेड,अशोक पवार,दिक्षा गुरव,सविता व्हटकर,अश्विनी पाटील,मारूती वडर व अनेक नवोदित व नामवंत कविनी आपल्या रचना सादर केल्या. प्रसिद्द लेखक डाॅश्रीकांत पाटील सर यांनी समारोप भाषणात साहित्यकारों चळवळ टिकली पाहिजे यासाठी ग्रामीण भागात संमेलन भरवली पाहिजेत असे सांगितले. .सौ,आरती लाटणे यांनी सुत्रसंचलन केले. तर सात्ताप्पा सुतार यांनी आभार मानले.
संमेलनसाठी रामनाथ डेंगळे,महादेव कुशाप्पा,सुरज रोंगे,प.कोडोली,पंडीत मोरे ,रावसो पाटील इंगळी,शिवाजी यडवान माणकापूर,सात्ताप्पा सुतार हुपरी यांनी परिश्रम घेतले.