
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
____________________________________
नांदेड पुणे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने 19 ते 20 डिसेंबर रोजी लातूर येथे झालेल्या विभागीय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात प्रज्वल बाळकृष्ण धर्मापुरीकर यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपला प्रवेश राज्य पातळीवर निश्चित केला आहे तसेच स्वयं गिरीमयूर कुराडे, विवेक गजलवार ,शुभम कसबे ,माधव राठोड, गवते ओंकार ,यांना द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले
सर्व खेळाडूचे अभिनंदन सांस्कृतिक संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, रोहित देशमुख ,शाळेचे प्राचार्य धनंजय वकील कमाडट केव्ही आरवी राव मुख्य शिक्षक एकनाथ पाटील क्रीडा शिक्षक गणेश कळकेकर, पंडित भालेराव ,परमेश्वर बोडके, आदींनी अभिनंदन केले आणि प्रज्वल धर्मापुरीकर यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
प्रज्वल धर्मापुरीकर यांच्या या यशाबद्दल अनेक स्तरातून त्याचं त्याच्या शिक्षकांचा आणि पालकांचं कौतुक करण्यात येत आहे