
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना कळविण्यात येते की सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून तुमच्या गावातील शेतकरी बांधवांना कृषी महोत्सवास उपस्थित राहण्याचे कळविण्यात यावे.१ जानेवारी रोजी मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब मुखमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री.देवेंद्रजी फडवणीस साहेब उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते हस्ते कृषी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.तरी कंधार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दिनांक ५ जानेवारी रोजी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तारीख देण्यात आली आहे तेव्हा शेतकऱ्यांनी स्वखर्चाने राज्यस्तरीय कृषी महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे असे श्री.डि.ए.भारती साहेब विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती कंधार यांनी दैनिक चालू वार्ताशी कळविले आहे.याचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा.