
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
भोपाळवाडी :- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बळीराम पाटील प्राथमिक शाळा,भोपाळवाडी शाळेची सन-2022 – 2023 शैक्षणिक सहल दिनांक 28/12/2022 वार -बुधवार रोजी पहाटे ठिक 6:00 वाजता श्रीक्षेत्र माहुर येथे नेण्यात आली होती.यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी माहुर येथील किल्ल्यांची पाहणी करून रेणुका माता, अनुसया माता व दत्तात्रय मंदिर या तिनंही देवतांचे दर्शन घेऊन मनसोक्त जेवणाचा आनंद घेतला.तसेच परत येताना उमरखेड येथे विद्यार्थ्यांसाठी आईस्क्रीमची मेजवानी देऊन सत्यगणपती मंदीराचे दर्शन घेऊन रात्रीचे भोजन करून रात्री ठिक 10:00 वाजता भोपाळवाडी गावात सुखरुप पोहोचलो.अशा प्रकारे अगदी उत्साही वातावरणात शाळेची सहल संपन्न झाली.या सहलीत इयत्ता 1 ते 4 थी चे मुले-14 मुली-18 असे एकुण 32 विद्यार्थी तसेच शाळेचे मुख्याध्यापक माधव भोपाळे, राजश्रीताई कंधारे,राहुल टोम्पे इत्यादी शिक्षक मंडळी व सुनिता कौंसे मावशी सहलीत सहभागी झाले होते.