
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
तळोदा(प्रतिनिधी)जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी ५ ऑगस्ट २०२२ रोजी बिरसा फायटर्सने सहाय्यक जिल्हाधिकारी व तहसीलदार तळोदा यांना निवेदनाद्वारे केली होती.इतर जिल्ह्यात पदभरती सुरू झाली आहे. जिल्ह्यात वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जाते आहे.बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी यांनी जिल्हाधिकारी,सहाय्यक जिल्हाधिकारी यांना दुसरे स्मरण पत्र पाठवून इतर जिल्ह्याप्रमाणे पदभरती त्वरित करण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,पोलिस पाटील हा महसूल व पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतो.गाव पातळीवरील घटना,घडामोडी,तंटे,वाद गावातच सोडविण्याची कामे केली जातात.कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची काम पोलीस पाटील यांची भूमिका महत्त्वाची असते.परंतु,अद्यापही जिल्ह्यातील अनेक गावात पोलिस पाटील रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत.त्यामुळे गावांतील अनेक अडचणी येतात.तळोदा तालुक्यातील लक्कडकोट,बोरद,मेंढवढ,राजविहिर,अलवान,गाढवली,तुळाजा,झिरी,रापापूर,आमलाड,राणीपुर या महसुली गावात अजूनही पोलिस पाटील यांची रिक्त पदे भरली नसल्यामुळे अडचणी येतात.निवेदनाद्वारे त्वरित पदभरती करण्याची मागणी केली आहे.