
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
बहाद्दरपुरा :- कंधार -लोहा तालुक्याचे भाग्यविधाते आणि माजी खासदार,माजी आमदार मन्याड खोऱ्याचा बुलंद आवाज मन्याड खोऱ्याचा ढाण्या वाघ भाई डाॅक्टर केशवरावजी धोंडगे साहेबांनी खेड्यापाड्यातील वाडी तांड्यावरील असंख्य लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्या शिक्षणाची सोय करत त्यांचे जीवन फुलविले आहे. ज्या गरीब लेकरांना कधी पोटभर भाकर खायला मिळाली नाही. अनेक वर्षापासून शिक्षणापासून दूर राहिलेल्या अशा गोर गरीब लेकरांना पोटभर खायला देऊन त्यांच्या शिक्षणाची सोय करण्यात भाई केशवराव धोंडगे साहेबांनी मोठे योगदान राहिले आहे.
भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या आशीर्वादाने कंधार – लोहा तालुक्यातील वाडी तांड्यावरील लाखो विद्यार्थी आज राज्याच्या विविध ठिकाणी काम करताना अत्यंत अभिमानाने आणि गर्वाने मी श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी चा विद्यार्थी आहे. हे सांगताना आमच्या सगळ्यांचा उर भरून येतो. कदाचित भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी जर शाळा काढल्या नसत्या तर माझ्यासारखे असंख्य लाखो विद्यार्थी आज शिक्षणाच्या आणि ज्ञानप्रवाहाच्या बाजूला राहिले असते….
शिक्षण महर्षी भाई डॉक्टर केशवरावजी धोंडगे साहेब साहेबांनी माझ्या हाळदा गावात शाळा काढून हाळदा आणि हाळदा परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांना या ज्ञानप्रवाहात वाहतं करण्याचं मोठं काम केलं आहे.
कंधार लोहा मतदारसंघाचे भाग्यविधाते, गोरगरीब जनतेचे कैवारी,वंचित,उपेक्षित, सामान्य माणसाचा आवाज,गरीब सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपलं संबंध आयुष्य खर्ची घालणारे एक निर्भीड आणि राजकारणात राहून समाजकारण करणारे एकदृष्टी नेते म्हणून भाई डॉक्टर केशवराव धोंडगे साहेबांची ओळख होती.
भाई केशवराव धोंडगे साहेबांनी नेहमीच सामान्य माणसाच्या पाठीमागे उभे राहून अशा गरीब, उपेक्षित, वंचित आणि प्रतिभासंपन्न हजारो कर्मचाऱ्यांना आपल्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीमध्ये नोकरी देऊन त्यांच्या कायमस्वरूपी पोटापाण्याचा प्रश्न मिटविला आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
राजकारणातील हा ज्ञान महर्षी आज काळाच्या पडद्याआड झाला आहे. त्यांच्या जाण्याने कंधार लोहा तालुक्यात अपरिमित हानी झाली असून भाई डॉक्टर केशवराव धोंडगे साहेबांच्या कार्य आणि कर्तृत्वाला विनम्र अभिवादन मानाची जयक्रांतीआणि भावपूर्ण श्रध्दांजली
शिवा कांबळे,हाळदेकर
[राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक,नांदेड]