
दैनिक चालू वार्ता दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
केंद्रात आणि राज्यात सरकार जरी कोणाचे असले तरी प्रत्यक्ष जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकसभेत खासदार म्हणुन आम्हाला,विधानसभा आणि विधान परिषदेत आमदार आदिती आणि आमदार अनिकेत यांना निवडून दिले आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे विशेषतः प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,मुख्यमंत्री ग्राम सडक योजना,डोंगरी विकास किंवा जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत कामे मंजुर करण्याचा वैधानिक अधिकार आम्हाला आहे त्या अधिकाराचा वापर करून आमच्या शिफारशीनेच मतदार संघात विकास कामे मंजुर करण्यात येत असल्याचा खुलासा खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा येथे पत्रकार परिषद घेऊन केला आहे.म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रस्तावित व मंजुर असलेले प्रंतप्रधान ग्राम सडक योजना,मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत कामांचे श्रेय घेण्यासाठी सरसावलेल्या भाजप पक्षाचे पदाधिकारी वृत्तपत्रात प्रसिध्दी देवुन लोकांची दिशाभूल करत असल्याने त्यांचा समाचार घेताना.केंद्र सरकारने गेली तीन वर्षात महाराष्ट्र राज्यात विकास निधी देण्याबाबत टोलवाटोलवीची भुमिका घेतली.प्रंतप्रधान योजने अंतर्गत एक रुपयाचा निधी दिलेला नाही असे असतानाही विकास कामे मंजुर करण्याचा खासदारांचा अधिकार संबंधीत खात्याचे मंत्री आणि अधिकारी परस्पर कसे काय घेऊ शकतात? त्यांचा आडमुठेपणा लक्षात आल्याने आपण स्वतः पुढाकार घेऊन खासदार सुप्रियाताई सुळे यांचे मार्फत केंद्रीय मंत्री गिरिराजसिंग यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रातील मोठी शहर वगळून उर्वरीत खासदारांची बैठक घेण्याचा आग्रह केला असता संबंधीत खात्याचे अधिकारी वर्गा सोबत बैठक झाली.बैठकीला केंद्रीय मंत्री स्वाध्वी निरंजनदेवी,केंद्रिय मंत्री डॉ.भारती पवार यांचेसह महाराष्ट्रातीलभाजप,शिवसेना उद्धव ठाकरे गट,शिंदे गट,काँग्रेस आणि मित्र पक्षाचे खासदार उपस्थित होते.संपन्न झालेल्या चर्चेत खासदारांचे शिफारस केलेल्या पत्रानेच त्यांचे मतदार संघातील कामे मंजुर करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.त्या नुसार दिनांक २७ डिसेंबर रोजी आपण मतदासंघांतील अनेक कामांची यादी मंजुरी मिळण्यासाठी सादर केली असल्याची माहिती खासदार तटकरे यांनी वार्तालाप करताना पत्रकारांना दिली.म्हसळा तालुक्यातील प्रंतप्रधान ग्राम सडक योजनेतील मंजुर व प्रस्तावित रस्ते विकास आपल्या मागणीने मंजुर करण्यात आली आहेत असे सांगणारे भाजपचे पदाधिकारी जनतेची दिशाभूल व फसवणूक करत आहेत अशाने त्यांचे राजकिय मनसुबे सत्यात उतरणार नाहीत.श्रीवर्धन,माणगाव,रोहा म्हसळा तालुक्यातील जनता सुज्ञ असल्याचे खासदार तटकरे यांनी भाजपचे पदाधिकारी कृष्णा कोबनाक यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली.अशाच प्रकारे श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांची कामे त्यांचे शिफारशीने मंजुर झाली असल्याचे निदर्शनास आणुन दिले. अधिक माहिती देताना नव्याने खरसई गाव संसंद आदर्श गाव योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे त्याचे कार्यवाहीला आचारसंहिता संपल्या नंतर सुरवात होईल.मतदार संघात ठाकरे सेना आणि राष्ट्रवादीचा मेळ आजुन पाहिजे तसा जुळत नाही परस्पर विरोधी निवडणूक लढवली जाते असे प्रश्न खासदार तटकरे यांना विचारला असता सद्या स्थितीत शिवसेनेचे दोन गट पडले असले तरी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारा वर्ग जास्त आहे. आघाडी बाबत तसे होऊ नये यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचा खुलासा खासदार सुनिल तटकरे यांनी केला आहे. घणसार कॉम्प्लेक्स येथे आयोजीत पत्रकार परिषदेत खासदार सुनिल तटकरे यांच्या समावेत ज्येष्ठ नेते अली कौचाली,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,तालुका अध्यक्ष समीर बनकर,मुंबई अध्यक्ष महेश शिर्के,माजी सभापती बबन मनवे,अंकुश खडस,नगरअध्यक्ष असहल कादिरी,उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,संजय कर्णिक, महीला अध्यक्षा सोनल घोले आदी मान्यवर उपस्थित होते.