
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
पुणे दि. महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज .छत्रपती शाहू महाराज .मा ज्योतिबा फुले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे .कर्मवीर भाऊराव पाटील. संत गाडगेबाबा. संत तुकडोजी महाराज. संत तुकाराम महाराज. अहिल्याबाई होळकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वशंजांनी विविध राजकीय संघटना व पक्षामध्ये प्रवेश करून आपले आणि आपल्या पूर्वजांचे अस्तित्व आणि आत्मविश्वास राजकीय पक्षाच्या दावणीला बांधून बसलेल्या वशंजांनी आतातरी महापुरुषांच्या वशंजांनी राजकीय विचारसरणी नाकारून समाजाच्या हितासाठी आणि आर्थिक विकासासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केले
बहुजन जनता दलाच्या वतीने भीमा कोरेगाव (पेरणे फाटा )येथील विजय स्तंभाच्या २०५ व्या शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव (पेरणे फाटा) येथे झालेल्या बहुजन जनता दलाच्या अभिवादन सभेला उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना बहुजन जनता दलाचे अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे बोलत होते . पुढे पंडित भाऊ दाभाडे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी त्या वेळेच्या कोणत्याही राजकीय पक्षाला थारा न देता एकत्र येऊन सामाजिक हीत आणि आर्थिक विकासासाठी काम केले आणि सर्व समाज एक संघ केला असेही पंडित भाऊ दाभाडे यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अवमान राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला तेव्हा राज्यातील मराठा समाज आणि माळी समाजाच्या नागरिकांनी किंवा वंशजानी रस्त्यावर येऊन कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही किंवा साधा निषेध आणि निषेध मोर्चा व आंदोलने केली नाही .त्याचवेळी भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री असलेले चंद्रकांत दादा पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मा ज्योतिबा फुले .कर्मवीर भाऊराव पाटील.यांचा अवमान केला तेव्हा राज्यातील आंबेडकरवादी आणि भीमसैनिकांनी रस्त्यावर उतरून निषेध करून. धरणे आंदोलन आंदोलन निषेध मोर्चे काढले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर.मा ज्योतिबा फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करणाऱ्या भाजपाचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या तोंडाला नाही फासून त्यांना माफी मागण्यासाठी भाग पाडले अशा आंबेडकरवादी आणि भीमसैनिकांच्या ऐक्याचे आत्मचिंतन इतरही घटकांच्या समाजाने करावे असे आवाहनही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी केले.
यावेळी बहुजन जनता दलाच्या विदमान नगरसेविका प्रमोदिनी डावखरे.माजी नगरसेवक केशव गंगणे. पंडित कोळी.ग्रा.प. सदस्य. सौ निर्मला गुरव ग्रा.प.सदस्य.सिताराम गायकवाड.माजी सरपंच. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संचालन बहुजन जनता दल विदर्भ अध्यक्ष शंकर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन बहुजन जनता दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अरुण बरगडे यांनी केले
यावेळी हिम्मत पाटील रोहित लांडगे राजेश जानकर प्रा भाऊसाहेब शिंदे दादासाहेब गायकवाड नाथसागर पळसकर किशोर राऊत सुनील पाटील आनंद गजभिये महेंद्र इंगळे धनराज माने दिपक कांबळे विशाल खंडेराव सचिन गोस्वामी तुलसीदास तरडे यांच्यासह बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत