
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : वर्षाच्या सुरुवातीला संगीत विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. कोलकाताच्या प्रसिद्ध गायिका सुमित्रा सेन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी सुमित्रा सेन यांना अखेरचा श्वास घेतला.
सुमित्रा सेन यांच्या निधनाची बातमी त्यांची मुलगी श्राबनी सेन यांनी फेसबूकच्या माध्यमातून दिली. फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी आईच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आई आज भोरमध्ये आम्हाला सोडून गेली…’ अशी पोस्ट श्राबनी सेन यांनी केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यात सुमित्रा सेन यांची प्रकृती खालावली होती. म्हणून त्यांना २९ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांनी डिस्चार्ज देखील मिळाला. पण घरी आल्यानंतर सुमित्रा सेन यांचं निधन झालं.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना ब्रॉन्कोप्न्यूमोनियाचं निदान झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांनंतर त्यांची प्रकृती खालावली, अखेर ३ जानेवारीला पहाटे सुमित्रा सेन यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे संगित विश्वात आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.