
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे ________________________________________
याप्रसंगी ग्रंथालयाचे ग्रंथपाल पुंडलिक कदम, जयराम गुरूपवार ,विठ्ठल पुठ्ठेवाड ,कुलकर्णी सर, पटने सर, थडके पाटील देगावकर, मोतेवार सर प्रा.राजेंद्र भुसाळे सर, स्वामी सर, मा.नरंगलकर , यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी ग्रंथालयाचे ग्रंथपाल पुंडलिक कदम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर उजाळा टाकला ते म्हणाले सावित्रीबाई मुळेच आज महिलांची प्रगती पहावयास मिळत आहे पुरुषांच्या बरोबरीने चालण्याचा अधिकार सावित्रीबाईच्या शिक्षणामुळेच महिलांना मिळाला असल्याचे सांगत आजच्या नवतरुणींनी सावित्रीबाईचा आदर्श घेत शिक्षणामध्ये भरारी घेण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे आभार मोतेवार सर यांनी मानले