दैनिक चालू वार्ता राजगुरूनगर ता. प्रतिनिधी- मयुरी वाघमारे.
===================
राजगुरूनगर :- दिनांक 9 जानेवारी 2023 ता. खेड, जि. पुणे राजगुरूनगर. दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर व मांदळे विकासवर्धिनी यांचा तर्फे व्याख्यान्मालेच आयोजन करण्यात आले.
स्थळ :- बाफन रंग मंदिर वाडा रोड राजगुरूनगर.
दिनांक 6 जानेवारी शुक्रवार पासून या व्याख्यानमलेला सुरुवात झाली होती राजगुरूनगर मध्ये आयोजित या व्याख्यानमालेला मोठ्या प्रमाणात श्रोत्यांकडून प्रतिसाद देण्यात आला. प्रथम पुष्प वक्ते- श्री. अशोक नायगावकर हे प्रसिद्ध हास्यकवी यांचा विषय मिश्किली आणि कविता हा होता. द्वितीय पुष्प वक्ते- श्री. संदीप काळे यांचा विषय सकारात्मक पत्रकारिता आणि समाज जीवन हा होता. या विषयातून काळे यांनी पत्रकार आणि समाज यांच्यातील नाते कशा प्रकारे असते हे त्यांनी श्रोत्यानपुढे मांडायचे कामं त्यांनी उत्तम प्रकारे . पत्रकार हा एक समाजिक बांधिलकी असलेला घटक आहे असे ते म्हणतात. तो समाज प्रबोधनाचे कार्य करत असतो..
तृतीय पुष्प वक्ते – पदमश्री ऍड. श्री उज्ज्वलजी निकम जेष्ठ विधी तज्ञ. विषय गाजलेले खटले व भेटलेली माणसे. यामध्ये त्यांनी आजपर्यंत त्यांच्या केसेस मध्ये त्यांना कोणकोणत्या पद्धतीची माणसे भेटली कोणते न्यायालयीन खटले अधिक गाजले या वर त्यांनी काही प्रसंग सांगितले.
चतुर्थ पुष्प वक्ते – श्री. उल्लास मुके व श्री रितेश आंद्रे आणि सहकारी विषय झिरो टू हिरो यामध्ये त्यांनी मुंबईतील डब्यावाल्यांचे वर्णन झिरो टू हिरो असे केले आहे. रोजच्या धावपळीचा जीवनात हे डबावाले जीवाची धडपड करून डब्बा वेळेत कसा पोच करतात त्यांच्या या संघर्षाची कथा यातून त्यांनी सांगितली आहे.
संयोजक :- जयश्री संतोष पडवळ ( अध्यक्ष रोटरी क्लब राजगुरूनगर ) प्रशांत कर्नावट ( अध्यक्ष व्याख्यान्माला समिती ) अर्चना कारंडे ( सेक्रेटरी रोटरी क्लब राजगुरूनगर ) श्री. नंदकुमार राजाराम मांदळे ( अध्यक्ष मांदळे विकासवर्धिनी )


