दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देगलूर महाविद्यालयातील कनिष्ट महाविद्यालयात अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे आज उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला आहे.
या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पीआय. ) मा. सोहमजी माचरे हे होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रवारकमविचे उपप्राचार्य एम. एन. चमकुडे व कनिष्ठ महाविद्यालय विभागाचे सर्व सहकारी प्राध्यापक विद्यार्थी या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माननीय माचरे यांनी एमपीएससी व विविध स्पर्धा परीक्षा या संदर्भात मार्गदर्शन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात व प्रस्तुत केंद्राद्वारे व्यक्तिमत्वाचा विकास करुण घेन्यासंदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्राचार्य एम. एन. चमकुडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. एस. बी. गुरुडे आणि पाहुण्यांचा परिचय प्रा. वानोळे एस. एस. यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. धनराज लझडे यांनी मांडले या कार्यक्रमाचे नियोजन स्पर्धा परीक्षा समिती यांनी केले होते.


