दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
मार्लागुंडा तांडा येथील जि . प . प्रा . शाळा दि .०९/०१/२०२३ सोमवार रोजी सुमारे १२ वाजता कुलुप लाऊन येथील शिक्षक गायब सविस्तर माहिती अशी आहे की , जि.प. प्राथमिक शाळा मार्लागुंडा तांडा शाळेत ०१ ते ०४ वर्ग असुन , मुख्याध्यापक गिरी आणि शिक्षक सुधाकर बागडे असे दोन शिक्षकांची नेमणूक असुन , या गावाला दोनवेळा भेट दिली असता , त्या दोन्ही वेळेस दि ०४/०१/ २०२३ व ०९/०१/२०२३ रोजी शाळेला कुलुप आढळून आले या शाळेच्या पाठीमागे राहत असलेले नागरिक माजी सरपंच अशोक लालसिंग जाधव यांना विचारपूस केली असता , या शिक्षकाचा लंपनडाव सुरू असुन , हे दोन्ही शिक्षक एकत्र हजर राहत नसून यांनी दिवस वाटून घेतले आहेत. सोमवार ,मंगळवार ,बुधवार . या दिवशी सुधाकर बागडे येतो आणि गुरुवार शुक्रवार शनिवारी मुख्याध्यापक गिरी येतो . हे दोन्ही शिक्षक तेलंगणा राज्यात म्हैसा या ठिकाणी निवासी राहत असुन , हे दोन्ही शिक्षक दोन वर्षांपासून पूर्णवेळ शिकवत नसून दुपारपर्यंत अर्धी शाळा करून तांडी मारतात यामुळे माझ्या तांड्यातील शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे . तेव्हां वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करून यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी असे मत माजी सरपंच अशोक लालसिंग जाधव यांनी व्यक्त केले आहे .


