दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर: देगलूर शहरातील भाजीपाला विक्रेते तथा बंडीवाले हे किरकोळ दुकानासमोरच आपले भाजीपालाविक्री दुकान थाटत – असल्याने दिसून येत आहे याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष जाणून बुजून होत आहे की बंडी वाले भाजीवाले यांचं व नगरपालिका यांचं संगणमत झालेला आहे का असे शहरातील व्यापारी व नागरिकांना वाटते शहरातील व्यावसायिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. यामुळे दुकानासमोरील भाजीपाला विक्रेत्यांना ठराविक जागा देण्यात यावी अशी मागणी व्यवसायिकातून जोर धरीत आहे.
देगलूर शहरात तळगल्ली, लोहीया मैदान, रूग्णसेवा मंडळ, बस्वेश्वर पुतळा परीसर नागेश्वर मंगल कार्यालय रोड इ. भागात भाजीपाला मार्केट दररोज भरत असते तर याच ठिकाणी देगलूर शहरातील सर्व प्रकारची दुकाने म्हणजेच कापड दुकान, किराणा दुकान यासह जनरल स्टोअर्स व इतर लोकोपयोगी दुकानांची गर्दी आहे. अशातच भाजीपाला विक्रेते हे दुकानासमोर बसून भाजीपाला विक्री करीत आहेत त्यामुळे अशा दुकानात येणाऱ्या नागरिकांना किंवा ग्राहकांना आपले वाहन लावण्यासाठी जागा शोधावी लागते. किंवा वाहन थांबविण्यासाठी रस्त्याचा उपयोग करावा लागत आहे.
याशिवाय ग्राहकांचा जर येता-जाता भाजीपाला विक्रेत्यांना धक्का लागला तर येथे नेहमीच हुजत चालू असते. यातच मोकाट जनावराचा वावर असतोच त्यामुळे नागरिकांना बाजारहाट करण्यासाठी या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भाजीपाला विक्रेते ऐन रस्त्यावर बसत असल्याने दुकानात कसे जावे हाही प्रश्न ग्राहकांना सतावत असतो कारण त्यांना
ओलांडून दुकानात जावे लागत असल्याने अनेकदा ग्राहक दुसरीकडे दुसऱ्या दुकानात जाण्याचा पर्याय पाहतात. त्यामुळे येथील कापड दुकान व्यावसायिकांना मोठी अडचण होत आहे. त्यामुळे येथील भाजीपाला विक्रेत्यांना ठराविक जागा देण्यात यावी किंवा भाजीपाला विक्रेत्यांना जी जागा देण्यात आली आहे त्याच ठिकाणी त्यांना बसविण्यात यावे व दुकानासमोर भाजीपाला विक्रेत्यांना बसू देऊ नये अशी मागणी कापड व्यावसायिकांसह इतर दुकान मालकांनी केली आहे


