दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
विष्णूपूरी येथे गोदावरी नदीवर देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण साहेब यांनी विष्णूपूरी जलाशय बांधले पण जलसंपदा विभागातील यांत्रीकीकरण/ जल व्यवस्थापना च्या व अधीक्षक अभियंता यांच्या हलगर्जीपणामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पिके वाळत आहेत आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी वारंवार सुचना करून सुध्दा जलसंपदा विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना जर १० जानेवारी पर्यंत पाणी नाही मिळाल्यास दि. ११ जानेवारी रोजी जलसंपदा विभागाच्या विरोधात आ. मोहन अण्णा हंबर्डे हे गांधीगिरीने आंदोलन करणार आहेत अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे यांनी दिली.
लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षीण मतदार संघातील सोनखेड सर्कल मधील शेतकऱ्यांना डॉ. शंकरराव चव्हाण विष्णूपूरी जलाशयाचे पाणी १० जानेवारी रात्री १२ पर्यंत सोडावे प्रमुख मागणीसाठी नांदेड दक्षिण चे आ. मोहन अण्णा हंबर्डे यांचे अधीक्षक अभियंता चौगुले यांना वाजत गाजत जाऊन पुष्पहार घालण्याचे गांधीगिरी आंदोलन आज दि.११ जानेवारी २०२३ रोजी नांदेड येथे आयोजित केले असून तेव्हा या आंदोलनात सोनखेड सर्कल मधील सर्व शेतकऱ्यांनी सामिल व्हावे असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्रीनिवास मोरे यांनी असे नमूद केले की, दगडगाव, बोरगाव,सोनखेड या शिवारात रब्बी हंगामातील गहू हरभरा पिकासाठी डॉ.शंकरराव चव्हाण विष्णूपूरी जलाशयाचे पाणी पोहचलेले चालू असताना या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता चौगुले यांनी बंद करून चांगले काम केले फार बहादुरी दाखवली मर्दानी दाखवली त्यांना या त्यांच्या कामाचे बक्षीस देण्यासाठी शेतकऱ्यांचा गहू, हरभरा हे रब्बी पिक वाळत आहेत मराठवाड्याचे भगिरथ देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांनी विष्णूपुरी प्रकल्प करून दिला पण एरिकेशनच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे होत आहे या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता चौगुले, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, यांत्रीकीकरण/जल व्यवस्थापन विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे सोनखेड सर्कल मधील गावात शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही गहू, हरभरा आदी खरीप पिके वाळून जात आहेत एरिकेशन विभागाचे फार मर्दानी दाखवली तेव्हा शेतकऱ्यांच्या पिकांना तात्काळ पाणी सोडण्याच्या प्रमुख मागणीसाठी दि.११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता डॉ. शंकरराव चव्हाण विष्णूपूरी जलाशयाचे शूरवीर अभियंता चौगुले यांना वाजत गाजत जाऊन पुष्पहार घालण्याचे गांधीगिरी आंदोलन आयोजित केले असून तेव्हा या आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी सामिल व्हावे असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे यांनी केले आहे.


