दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
मौजे बोरगाव आ. तालुका लोहा या गावात सतत टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने पॅनल प्रमुख पुंडलिकराव हारजी पाटील, सरपंच सौ. कांताबाई हंकारे, उपसरपंच सौ. जयश्री पाटील, सर्व ग्रा. प. सदस्य तसेच गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन गावातील पिण्याच्या पाण्याचा व सांडपाण्याचा प्रश्न मिठावा म्हणून केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून “जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजने” मध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्री पुंडलिकराव पाटील यांनी सतत प्रयत्न करून ही योजना सुनेगाव तलाव ते बोरगाव आ. अशी 2021- 2022 या आर्थिक वर्षात मंजूर करून आणली या योजनेमध्ये सुनेगाव तलाव येथे विहीर, विहीर ते बोरगाव आ. अशी पाईप लाईन, बोरगाव येथे पाण्याची टाकी व गावात नळ जोडणी अशी असून ही योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एका शासकीय कंपनीस ओपन कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देण्यात आली ही योजना जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली सुरू असून या योजनेतील विहिरीस जिल्हा परिषदेचे भूवैज्ञानिक अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड पाणीपुरवठा विभाग अभियंता पाटबंधारे सिंचन विभागाचे अभियंता या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र सुनेगाव तलाव येथे उपस्थित राहून विहीर पाडण्या च्या अगोदर जागेची पाहणी करून त्याठिकाणी कोअर बोअर घेऊन जागा निश्चिती करून लेखी अहवाल दिल्यानंतरच त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांच्या नियंत्रणात पाझर विहिरीचे काम सुरू झाले व ते काम काम जून 2022 मध्ये पूर्ण झाले आहे. विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विहिरीतील पाण्याची प्रयोगशाळे मध्ये तपासणी केली असता पाणी पिण्यास योग्य असले बाबत आहवाल देण्यात आला आहे. सदर तलावातून लोहा शहर, सुनेगाव सायाळ धानोरा ,पारडी व इतर गावांना पिण्याचे पाणी सुरळीत सुरू आसून त्यामुळे सुनेगाव तलावातील पाणी दूषित आहे या बातम्यांनी नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही.
सदरील योजना बोरगाव आ. येथील चार हजार लोकांचे पिण्याचे पाण्याचा प्रश्न मिटविणारी आहे. व भारतीय जनता पक्षाचा स्वतःला कार्यकर्ता समजणारा माधव गायकवाड हा स्वतःला आर्थिक लाभ मिळावा म्हणून कोणत्याही अधिकृत महिती नसतांना प्रसिद्ध वृत्तपत्रात खोट्या बातम्या देत आहे असा सवाल पुंडलिकराव पाटील, सरपंच सौ. कांताबाई हंकारे , उपसरपंच सौ. सौ. जयश्रीताई पाटील यांनी केला आहे. तेव्हा पत्रकार बांधवांनी योग्य व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारपूस करून बातम्या लावाव्यात अशी विनंती पुंडलिकराव पाटील यांनी केली आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
__________________
सुनेगाव तलाव ते बोरगाव आ. ही पिण्याचे पाण्याची योजना सर्व विभागांच्या परवानग्या घेऊन सुरळीतपणे सुरू असले बाबत सांगितले आहे.


