दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
मोबाईलमुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो. तसेच मुलांच्या हातात मोबाईल असल्यास त्याचे आहाराकडेही दुर्लक्ष होते. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाइलपासून लांब ठेवून त्यांना मैदानी खेळासाठी प्रवृत्त करावे. – डॉ. विजयकुमार सुळ वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय भूम
भुम:- कोवळी मुले मोबाईलच्या विळख्यात अडकली असून,तर मोबाईल मुळे तरुणाई माणुसकी विसरली असे चित्र सध्या दिसत आहे.आधुनिक प्रगत युगात अनेक क्षेत्रात विज्ञानाने नेत्रदीपक प्रगती केली. त्यातीलच संदेश वहन व संप्रषनाचे प्रभावी वाहक म्हणून भ्रमणध्वनीची निर्मिती झाली आणि हळूहळू आजच्या धकधकीच्या व धावपळीच्या जीवनातील जलद संपर्क म्हणून मोबाईल हा जीवनावश्यक भाग बनला. कॉलरेटच्या स्पर्धेत टिकण्यासाठी किंमतील विलक्षणीय घट केल्याने सामान्य माणसालासुद्धा मोबाईल वापरणे शक्य झाल्याने मोबाईल कंपन्याचा ‘हर हात में मोबाईल’ हा नारा खरा होत आहे. परंतु ज्या जीवनाश्यक वस्तू बनलेल्या मोबाईलचे सदुपयोग होण्यापेक्षा दुरुपयोग अधिक प्रमाणात होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.आजच्या युगात मोबाईलचे स्त्रोत हे मोठ्या शहरातून थेट ग्रामीण भागात झपाट्याने पसरले असून या मोबाईलच्या जाळ्यात अनेक ग्रामीण अल्पवयीन विद्यार्थी गुरफटत चालल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. अनेक चायनामेड, विदेशी कंपन्यांनी अगदी स्वस्त किंमतीत अनेक आकर्षक मोबाईल उपलब्ध केले असल्याने युवा पिढीचा कल ब्रॅन्डेड मोबाईलपेक्षा चायनाकडे वळल्याचे दिसून येत आहे. तसेच या मोबाईलमध्ये अनेक सोई-सुविधा असल्याने चौकाचौकांत टपऱ्यांवर असणारे हे अल्पवयीन मुले मोबाईलमधील ब्लू टुथस्, वॉस्टअपचा वापर अश्लिल चित्रफित पाहण्यासाठी करीत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अनेक श्रीमंत पालक आपल्या मुलांना अल्पवयातच मोबाईल खरेदी करुन देतात. यातील तरुणांचा कर्दनकाळ ठरलेल्या अनेक गेमच्या विळख्यात अनेक मुले आणि नागरिक सापडले आहेत. मोबाईलवर लुडोसारख्या अनेक गेममध्ये ते गुंतून राहतात, त्यामुळे जवळ असूनसुद्धा जवळच्याला बोलायला वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे.शहरी भागात अगोदरपासूनच मुलांच्या हातात मोबाईल होता, मात्र कोरोना साथीत सगळीकडे ऑनलाइन शिक्षण चालू झाले, तेव्हापासून ग्रामीण भागातही मोबाइल मुलांच्या हातात जास्त प्रमाणात आले आहेत. त्यामुळे आता सतत मोबाइल मुलांना हातात ठेवावा वाटत असल्याचे चित्र आहे. मोबाईलमुळे लहान मुलांच्या दृष्टीवर दुष्पपरिणाम होऊन नजर कमी होते.


