दैनिक चालु वार्ता अतनूर प्रतिनिधी –
साई डेंटल केअर अँन्ड इम्प्लँट सेंटर, साई हॉस्पिटल,उदगीर व जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,अतनूर यांच्या संयुक्त विद्यामाने ग्रामपंचायत कार्यालय अतनूर येथे मंगळवार दि.१० जानेवारी रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत मोफत दंतरोग चिकित्सा व सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात प्रसिध्द लेप्रोसोपीक तथा सर्जनतज्ञ डॉ.माधव वीरप्पा चंबुले यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या १९७ रूग्णांची मोफत तपासणी करून मोफत गोळ्या व औषधेउपचार करण्यात आले. यावेळी मुख व दंतरोग तज्ञ डॉ.सुशील टी.चंबुले, जनरल फिजिसिन डॉ.संदीप चंद्रहंस नादरगे येणाऱ्या रूग्णांची तपासणी केली. शिबीर यशस्वीतेसाठी आयोजक व संयोजक जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सचिव बी.जी.शिंदे, उध्दव ठाकरे शिवसेनेचे जळकोट तालुकासंघटक मुक्तेश्वर पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे अतनूरकर, उपसरपंच बाबूराव कापसे, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे जळकोट तालुकाध्यक्ष कैलास सोमुसे-पाटील, भाजपाचे जळकोट तालुका उपाध्यक्ष ईश्वर कुलकर्णी, किशन मुगदळे, युवा कार्यकर्ते सुदाम बाबर, रवि पांचाळ, धोंडीराम सोमुसे, युवासेनेचे माधव सोमुसे, ग्रामपंचायतचे आॕपरेटर यंत्रचालक गुंडू बोडेवार, सेवानिवृत्त शिक्षक व्यंकटराव कदम, राम गायकवाड, राघोबा गायकवाड, बाळू सावकार कोडगीरे, सारंग जोशी यांनी विशेष परिक्षेम घेतले. याचा लाभ अतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २८ गावे, ६ उपक्रेंद्रातील गाव-वाडी-तांडा-वस्तीतील नागरीकांनी, रूग्णांनी घेतला.


