दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अचलपूर न्यायालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.या न्याय मंदिरासाठी ५०.७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.न्याय मंदिराच्या इमारतीसाठी १०८ कोटींचा खर्च अपेक्षित असून,आमदार बच्चू कडू व अचलपूरचे वकील संघ यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.अचलपूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीला मंजुरी देण्यात आली आहे.बांधकामाचे काम लवकरच सुरू होणार असून वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले.तर आमदार बच्चू कडू यांनी शासनस्तरावर पुढाकार घेतला. त्यामुळे बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे. वास्तुविशारदामार्फत इमारतीचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे.जी प्लस ही न्यायालयीन इमारत उभारण्यात आहे.ज्यामध्ये या इमारतीत दोन दिवाणी कनिष्ठ विभाग,तीन दिवाणी कनिष्ठ विभाग,चार जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश,एक पॉस्को न्यायालय असेल.ब्रिटिश काळातील इमारत पाडून ही भव्य वास्तू तयार करण्यात येणार आहे.कॅम्पसमध्ये पार्किंगच्या सुविधेसह प्रवेशद्वाराचे योग्य नियोजन केले जाईल,सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील.गुणवत्ता,ध्वनीशास्त्र सराव,खुल्या जागेचे नियोजन,प्रशासकीय कामासाठी हॉल,सार्वजनिक परिसंचरण,विश्रांती क्षेत्र,प्रथमोपचार सेवा,बार असोसिएशन कार्यालय,वकिलांसाठी बैठक व्यवस्था,मुद्रांक विक्रेता,टंकलेखक,पोलीस पुस्तक,नोटरी,झेरॉक्स केंद्र,डाक सेवा इ.समाविष्ट केले जाईल.रेकॉर्ड रूम, न्यायाधीश कार्यालय,साक्षीदारांच्या बैठकीची व्यवस्था,न्यायाधीशांच्या चर्चेसाठी विशेष झोन तयार करण्यात येणार आहे.ही वास्तू दगडी तुकड्यांपासून बनवली जाणार असून,त्यात ग्रीक शैलीचा वापर करण्यात येणार आहे,अचलपूर वकील संघाचे स्वप्न साकार होणार आहे.


